जंतरमंतरवर भारताचे संविधान जाळणाºयांना तत्काळ अटक करावी-सावंतवाडी पोलिसांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:47 PM2018-11-19T17:47:54+5:302018-11-19T17:48:42+5:30
बहुजन क्रांती मोर्चातर्फे सावंतवाडी पोलीस ठाण्यावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना सादर करण्या
सावंतवाडी : बहुजन क्रांती मोर्चातर्फे सावंतवाडी पोलीस ठाण्यावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना सादर करण्यात आले.
बहुजन क्रांती मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने विविध मागण्यांबाबत रविवारी पोलीस ठाण्यात निवेदन देण्याचे आयोजन केले होते. दिल्ली येथे जंतरमंतरवर भारताचे संविधान जाळणाºयांना तत्काळ अटक करावी, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अहमदाबाद-गुजरात येथे शांततेत रॅली काढताना अटक करून कार्यकर्त्यांवर लाठीमार करणाºया तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाºया पोलिसांवर कारवाई करावी,
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणूक कार्यपद्धती बदलून ईव्हीएम मशीन बंद करून त्याऐवजी मतपेटीतून मतदान करण्याची पद्धत अवलंबावी, एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेली शिष्यवृत्ती द्यावी, त्या संस्थांकडे ती रक्कम जमा केली जावी, कोरेगाव-भीमा येथे दंगल-जाळपोळ घडविणाºया भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करावी आदी विविध मागण्यांचे निवेदन देत बहुजन क्रांती मोर्चा संयोजक अॅड. शिवराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक धनावडे यांची भेट घेतली. यावेळी सत्त्वशिला बोर्डे, सगुण जाधव, लाडू जाधव, स्नेहल कासले, रविकिरण तेंडोलकर, गीतांजली जाधव, शीतल जाधव, दादू कदम आदी उपस्थित होते.