श्रीधर नाईक उद्यानाचे होणार नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:23 PM2021-03-07T17:23:24+5:302021-03-07T17:25:57+5:30

Kankavli SandeshParkar Sindhudurg-जिल्हा नियोजन विकास निधी मधून कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यानाचे नूतनीकरण होणार आहे. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केला आहे . यासाठी खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक , आमदार दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले आहे . कणकवली शहरविकासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून दिला जात असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली.

Shridhar Naik Park to be renovated | श्रीधर नाईक उद्यानाचे होणार नूतनीकरण

श्रीधर नाईक उद्यानाचे होणार नूतनीकरण

Next
ठळक मुद्देश्रीधर नाईक उद्यानाचे होणार नूतनीकरण जिल्हा नियोजनमधून ७५ लाख मंजूर; संदेश पारकर यांची माहिती

कणकवली : जिल्हा नियोजन विकास निधी मधून कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यानाचे नूतनीकरण होणार आहे. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केला आहे . यासाठी खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक , आमदार दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले आहे . कणकवली शहरविकासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून दिला जात असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली. कणकवली येथील विजय भवनमध्ये रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख नीलम सावंत- पालक , उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव , माजी नगरसेवक भूषण परुळेकर आदी उपस्थित होते .

संदेश पारकर म्हणाले, कणकवली शहरातील काही दुकाने अलीकडेच आगीने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत . कणकवली नगरपंचायतकडे मोठ्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे कणकवली शहरासाठी अद्ययावत अग्निशामक बंबाची मागणी पालकमंत्र्यांकडे आम्ही केली आहे . त्याला त्यांनी अनुमती दिली असून येत्या काही दिवसांत अद्ययावत अग्निशामक बंब कणकवली शहराच्या सेवेत दाखल झालेला असेल.

भालचंद्र महाराज संस्थान सभामंडपासाठी ५० लाखाचा निधी जिल्हा नियोजनमधून दिला असून लवकरच सभामंडपाचे लोकार्पण करण्यात येणार आहे . शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक,आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कणकवली शहर विकासासाठी सातत्याने विकासनिधी दिला जात आहे.

कणकवली नगरपंचायतमध्ये सत्ता नसली तरी पक्षाच्या माध्यमातून शहर विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे . भूमिगत विजवाहिन्यांसाठी ६ कोटींचा आयपीडिएस योजनेतील मंजूर निधी नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांच्या दूरदृष्टी अभावी मागे गेल्याची टीका पारकर यांनी यावेळी केली .

ते म्हणाले, अन्य ठिकाणी १ हजार ५०० दर तर कणकवली नगरपंचायतने ५ हजार दर रस्ता दुरुस्तीसाठी केला होता . त्यामुळे भूमिगत विजवाहिनीचे काम होऊ शकले नाही . मात्र , शहराच्या हितासाठी अन्य योजनांतून भूमिगत विजवाहिनीसाठी शिवसेना पुन्हा निधी आणेल.

कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ ची जागा परमहंस भालचंद्र संस्थानला देऊन तेथील विस्तारीकरणासोबत नवीन शाळा इमारतीबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे . याबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही पारकर यावेळी म्हणाले .
 

Web Title: Shridhar Naik Park to be renovated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.