आंबोलीत महाकाय हत्तीचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:32 PM2021-03-24T17:32:29+5:302021-03-24T17:34:34+5:30

आंबोली भागात महाकाय हत्ती दिसल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या हत्तीकडून कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी वन विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

The sighting of a giant elephant in Amboli, an atmosphere of fear in the area | आंबोलीत महाकाय हत्तीचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

आंबोलीत महाकाय हत्तीचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

googlenewsNext

आंबोली : गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा परिसरात ठाण मांडून बसलेल्या जंगली हत्तीने (Elephant) आपला मोर्चा आंबोलीच्या दिशेने वळवला आहे. आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान त्या हत्तीने चक्क सरपंच बाळा पालेकर यांच्या घराच्या बाजूला हजेरी लावली. या महाकाय हत्तीचा व्हिडिओ पालेकर यांनी स्वतः चित्रीत केला आहे. 

आंबोली भागात महाकाय हत्ती दिसल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या हत्तीकडून कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी वन विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उच्छाद सुरूच आहे. आता सावंतवाडी तालुक्यातही हत्तींचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्ती शेती, बागायतींची नासधूस करणार असल्याने वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

Web Title: The sighting of a giant elephant in Amboli, an atmosphere of fear in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.