Sindhudurg: आंबोली-चौकुळ येथे काळ्या बिबट्याचे दर्शन
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 24, 2024 05:42 PM2024-02-24T17:42:45+5:302024-02-24T17:48:18+5:30
आंबोली ( सिंधुदुर्ग ) : चौकुळ येथे जंगलमय भागामध्ये काळा बिबट्या काही पर्यटकांना दिसून आला. त्या पर्यटकांपैकी काही पर्यटकांनी ...
आंबोली (सिंधुदुर्ग) : चौकुळ येथे जंगलमय भागामध्ये काळा बिबट्या काही पर्यटकांना दिसून आला. त्या पर्यटकांपैकी काही पर्यटकांनी त्याचे छायाचित्रणही केले. त्यामुळे चौकुळ आणि आंबोलीची जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, परंतु या जैवविविधतेचे मोठे नुकसान होण्याची भीती ही व्यक्त होत आहे. त्यामुळे वनविभागाने शिकारी आणि तस्कर असलेल्या लोकांवर करडी नजर ठेवणे गरजेचे असल्याचे मत निसर्गप्रेमींमधून मत व्यक्त होत आहे.
काळा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर म्हणून ज्याला ओळखले जाते. हा अतिशय दुर्मीळ बिबट असून, बिबट्यामधील जनुकीय बदलामुळे कधी-कधी काळा बिबट्या जन्माला येतो. हा बिबटा काळा असतो. आंबोलीमध्ये जवळपास २६ प्रकारचे वन्यप्राणी दिसून येतात. त्यामध्ये हत्ती, वाघ, बिबटे, अस्वल असे अनेक प्राणी आढळून येतात. त्यात भर म्हणून या काळा बिबट्यामुळे आंबोलीच्या जैवविविधतेमध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी केवळ आंबोलीमध्ये काळा बिबट्या आहे, असे म्हटले जायचे, परंतु आता त्याचे प्रत्यक्ष छायाचित्र मिळाल्याने आंबोली चौकुळची जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.