चिपळुणात कडकडीत बंद पाळून काढला मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 07:25 PM2019-02-18T19:25:02+5:302019-02-18T19:27:01+5:30
चिपळूण : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळुणातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे चिपळुणात कडकडीत बंद पाळण्यात ...
चिपळूण : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळुणातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे चिपळुणात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये रिक्षा व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवला होता.
शहरातील रिक्षा स्टॉपवर एकही रिक्षा दिसत नव्हती. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. एस.टी.सेवा व अत्यावश्यक सेवा फक्त सुरु होती. त्यामुळे बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसत होती. चिपळुणातील सर्व व्यापारी बंदमध्ये सामील झाले होते.
जम्मू-काश्मिर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले होते. याचा निषेध करण्यासाठी चिपळुणातील व्यापारी संघटनेची बंद संदर्भात बैठक झाली. या बैठकीनंतर चिपळूणात बंदची हाक देण्यात आली. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून ते बाजारपेठपर्यंत मूकमोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला.
या मूकमोर्चामध्ये नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वासुदेव भांबुरे, शैलेश वरवाटकर, मंदार ओक, वसंत कारंडे, उदय गांधी, सलीम मोटलानी, अफजल कच्छी, अस्लम मेमन, शादाब मेमन, सिध्देश लाड, उद्योजक नासिर खोत, नाझिम अफवारे, उदय चितळे, आशिष जैन, रुपेश जैन, मंगेश वेस्वीकर, उदय ओतारी, रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले, दिलीप खेतले, भाजपा शहराध्यक्षा वैशाली निमकर, लायन्सच्या सुप्रिया गुरव, माजी नगरसेविका रिहाना बिजले, निर्मला चिंगळे, संगिता पालकर, नगरसेविका रसिका देवळेकर, प्रितम देवळेकर, शिवानी पवार, सफा गोठे, नुपूर बाचीम, संजीवनी शिगवण, नगरसेवक कबीर काद्री, विजय चितळे, करामत मिठागरी, आशिष खातू, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, स्वाभिमान संघटनेचे अजय साळवी, युवक शहराध्यक्ष प्रफुल्ल पिसे यांच्यासह नगरसेवक व व्यापारी मोठ्या संख्येने या मूकमोर्चामध्ये सहभागी झाले होते.
जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत सर्वसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवून शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली होती.