राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘सायलेंट स्क्रिम’ प्रथम

By admin | Published: January 19, 2016 11:48 PM2016-01-19T23:48:34+5:302016-01-20T00:47:54+5:30

१७ जिल्ह्यांच्या सहभागाने स्पर्धा रंगली : कुडाळात निर्मिती थिएटर्सचे आयोजन

'Silent Scrim' in the state-level one-player competition | राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘सायलेंट स्क्रिम’ प्रथम

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘सायलेंट स्क्रिम’ प्रथम

Next

कुडाळ : कुडाळ येथील निर्मिती थिएटर्सच्यावतीने आयोजित केलेल्या कै. विजय कुडाळकर व कै. उमेश पावसकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मालवणच्या कलांकुर ग्रुपची ‘सायलेंट स्क्रिम’ ने प्रथम, तर रत्नागिरी रसिक रंगभूमी ग्रुपची ‘गिमिक’ ने द्वितीय क्रमांक मिळविला. आचरेकर प्रतिष्ठान कणकवली ग्रुपची ‘ऐन आषाढात पंढरपूरात’ व अक्षरसिंधु कणकवलीच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. स्पर्धेत राज्यातील १७ संघांनी सहभाग घेतला.
येथील विजय कुडाळकर व उमेश पासकर या हरहुन्नरी कलाकारांनी जगाच्या रंगमंचावरून अचानक एक्झिट घेतली. या नाट्यकलावंतांच्या स्मृती अखंड जपण्यासाठी कुडाळ येथील निर्मिती थिएटर्स कुडाळच्यावतीने मराठा समाजच्या रंगभूमीवर कै. विजय कुडाळकर व कै. उमेश पावसकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच इतर जिल्ह्यातील सुमारे १७ संघांनी कलाविष्कार सादर केला. देवगडच्या श्री समर्थ कलाविष्कार ग्रुपच्या ‘दहा वाजून दहा निमिटे’ एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
वैयक्तिक बक्षिसात प्रथम तीन क्रमांकाप्रमाणे : पुरूष अभिनय-रघुनाथ कदम (ऐन आषाढात पंढरपूर), आेंकार काणेरकर (दहा वाजून दहा मिनिटे, सचिन टिकम (सायलेंट स्क्रिम), स्त्री अभिनय-शुभदा पवार (सायलेंट स्क्रिम), स्रेहा पराडकर (एका रात्रीची गोष्ट), योगिता चव्हाण (आर्टिफिशल इंटेलिजेन्स) यांना गौरविण्यात आले. तसेच दिग्दर्शन विभागात रघुनाथ कदम (ऐन आषाढात पंढरपूर), तांत्रिक अंग-सायलेंट स्क्रिम (मालवण) यांनी यश मिळविले.
बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, उद्योजक संतोष सामंत, डॉ. जी. एस. कुलकर्णी, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे प्रणय तेली, उद्योजक शैलेश तिरोडकर, अजित फाटक, माजी ग्रामपंचायत सदस्य राजन नाईक, नंदू कुंटे, पत्रकार अजय सावंत, परीक्षक राजा शिरगुप्पे, संजय नाझरे, संतोष वालावलकर तसेच कै. विजय कुडाळकर यांची श्रेयस व श्रृतिका ही दोन लहान मुले या सर्वांच्या हस्ते पार पडला.
यावेळी निर्मिती थिएटर्सचे नागेश नाईक, अंकुश कुंभार, रजनीकांत कदम, समीर ठाकूर, गणेश बावलेकर, सचिन मदने, अजित सावंत, साई गवळी, दीपक राऊळ, विपुल धुरी, प्रविण वेंगुर्लेकर, अमोल बांदेकर, विनोद बांबुळकर, स्नेहा राऊळ, सुरेश राऊळ, बाबुराव कोंडसकर, देवेंद्र परब आदी पदाधिकारी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Silent Scrim' in the state-level one-player competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.