राष्ट्रीय स्तरावर प्रणालीला रौप्यपदक
By admin | Published: January 19, 2015 11:16 PM2015-01-19T23:16:50+5:302015-01-20T00:05:49+5:30
टेनिस स्पर्धा : महाराष्ट्र संघ उपविजयी
खेड : स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडियाद्वारा आयोजित दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे राष्ट्रीय स्तरावर झालेल्या फुटबॉल टेनिस स्पर्धेत अनेक राज्यांना मागे टाकून महाराष्ट्राचा संघ उपविजयी ठरला.त्या संघांमध्ये खेळणारी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) या प्रशालेतील १७ वर्षे वयोगटातील प्रणाली दत्ताराम शेलार हिचे खेड परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.या खेळामध्ये शेलार हिचे उत्कृ ष्ट नेतृत्व व खेळ वाखाणण्याजोगा होता. तिला या खेळासाठी क्रीडाशिक्षक संतोष भोसले यांची राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, प्रशाला समितीचे चेअरमन प्रकाश गुजराथी, प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संस्थेच्या भडगाव येथील प्रशालेची प्रणाली ही विद्यार्थिनी असून, तिच्या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
चेअरमन दीपक लढ्ढा, भोसले, मारुती आडाव, महादू वाघमोडे, शांतीलाल आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)