रजत तोरसकरला नागपुर येथील अश्वमेध टेबल टेनिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 17, 2024 12:09 PM2024-01-17T12:09:46+5:302024-01-17T12:10:23+5:30

सिंधुदुर्ग : टेबल टेनिस खेळाच्या आंतर विद्यापीठ अश्वमेध राज्य स्पर्धा नागपुर (१२-१४ जानेवारी २०२४) येथे पार पडल्या. सदरच्या स्पर्धे ...

Silver Medal to Rajat Toraskar in Ashwamedh Table Tennis Tournament at Nagpur | रजत तोरसकरला नागपुर येथील अश्वमेध टेबल टेनिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक

रजत तोरसकरला नागपुर येथील अश्वमेध टेबल टेनिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक

सिंधुदुर्ग : टेबल टेनिस खेळाच्या आंतर विद्यापीठ अश्वमेध राज्य स्पर्धा नागपुर (१२-१४ जानेवारी २०२४) येथे पार पडल्या. सदरच्या स्पर्धे मध्ये महाराष्ट्रातील बावीस विद्यापीठांनी भाग घेतला होता. रजत रविकिरण तोरसकर व त्याच्या संघाने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच रौप्य पदक पटकावले. तर पुणे येथील विद्यापीठ सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

रजत तोरसकर  हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भोपाळ येथील टेबल टेनिस च्या विद्यापीठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धामध्ये कास्य पदक मिळवले होते. त्यामुळे त्याला खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. रजत मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर आणि टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका ज्योती तोरसकर यांचा मुलगा आहे.

Web Title: Silver Medal to Rajat Toraskar in Ashwamedh Table Tennis Tournament at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.