सिंधुदुर्ग : पोलीस दलातील १३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, आदेश प्राप्त : ६५ प्रशासकीय, ६८ विनंती बदल्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:23 PM2018-05-04T15:23:22+5:302018-05-04T15:23:22+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १३३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर ६८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचा समावेश असून बदली पात्र कर्मचाऱ्यांना गुरुवारी बदली आदेश देण्यात आले आहेत.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील १३३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर ६८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचा समावेश असून बदली पात्र कर्मचाऱ्यांना गुरुवारी बदली आदेश देण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यासाठीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी प्रशासकीय बदलीस पात्र ठरलेल्या ७५ व विनंती बदली अर्ज केलेल्या १२३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी बदलीसाठी सोयीचे ठिकाण, बदली मागण्याच्या कारणांचा विचार करण्यात आला. यात प्रशासकीय बदलीसाठी पात्र असलेल्या ७५ कर्मचाऱ्यांपैकी ६५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या १२३ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ६८ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी बदली आदेश देण्यात आले आहेत.
१0 जणांच्या बदल्यांना स्थगिती
एका ठिकाणी कामकाजाचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले ७५ पोलीस कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र होते. त्यापैकी ६५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही करणास्तव १० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पोलीस अधीक्षकांनी स्थगिती दिली आहे.
बदलीपात्र कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होऊन त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश घेणे व कौटुंबीक स्थैर्य या दृष्टीने सोयीचे व्हावे यासाठीच मे महिन्याच्या सुरुवातीलाच या बदल्या करण्यात आल्या आहेत.
-दीक्षितकुमार गेडाम,
जिल्हा पोलीस अधीक्षक