सिंधुदुर्ग : बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांना 14 सुवर्ण पदक, जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:31 PM2018-12-20T12:31:11+5:302018-12-20T12:33:08+5:30
तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशन व अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या सहकार्याने कणकवली येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब जुनियर कॅडेट व जुनियर तायक्वांदो स्पर्धेत येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण पदक व ६ कांस्य पदकाची कमाई करून राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.
कणकवली : तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशन व अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या सहकार्याने कणकवली येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब जुनियर कॅडेट व जुनियर तायक्वांदो स्पर्धेत येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण पदक व ६ कांस्य पदकाची कमाई करून राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.
या स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
मुली-तनिष्का सावंत (क्योरोगी व पुमसे प्रकारात सुवर्ण पदक), दिशा पवार,पलक पवार,सोनिया ढेकणे, ऋतुजा शिरवलकर,करुणा उईके,चिन्मयी फाळके,मानसी जोशी यांनी सुवर्ण पदक मिळविले. तर निधी साळगावकर व ईशा नागवेकर यानी कांस्य पदक मिळविले.
तसेच मुलांमध्ये कुणाल नार्वेकर,अनूप साळुखे,सार्थक परब,राज जाधव,भूपेंद्र सावंत यानी सुवर्ण पदक मिळविले तर पियुष गायरी,आर्यन जाधव,हर्ष सावंत,सर्वेश दळवी यांनी कांस्य पदक मिळविले.यातील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सब जूनियर व कॅडेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत,सचिव सुलेखा राणे,खजिनदार रमेश राणे,सदस्य संदीप सावंत,मुख्याध्यापिका नमिता परब,पर्यवेक्षिका माधवी सावंत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक यांनी अभिनंदन केले.