सिंधुदुर्ग : महसूलची पाच चिरेखाणींवर कारवाई, खाण मालकांवर दंडात्मक कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:49 PM2018-08-28T16:49:05+5:302018-08-28T16:50:58+5:30

मालवण तालुक्यातील वाळू उत्खननावर केलेल्या धडक कारवाईनंतर तहसीलदार समीर घारे यांनी अनधिकृत चिरे उत्खननावर कारवाई केली आहे.

Sindhudurg: The action of the five irregularities of the revenue, and the penalty will be taken against the miners | सिंधुदुर्ग : महसूलची पाच चिरेखाणींवर कारवाई, खाण मालकांवर दंडात्मक कारवाई होणार

असरोंडी येथे महसूलच्या कारवाईत लाखो रुपयांची मशिनरी सील केली.

Next
ठळक मुद्देमहसूलची पाच चिरेखाणींवर कारवाईखाण मालकांवर दंडात्मक कारवाई होणार

मालवण : तालुक्यातील वाळू उत्खननावर केलेल्या धडक कारवाईनंतर तहसीलदार समीर घारे यांनी अनधिकृत चिरे उत्खननावर कारवाई केली आहे. असरोंडीतील चार आणि आंबेरीतील एका चिरेखाणींवर महसूलच्या पथकाने कारवाई केली. चिरेखाण व्यवसाय करण्यासाठी परवानगी नसताना बेकायदेशीरपणे चिरेखाण व्यवसाय केल्याप्रकरणी पाचही जणांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मालवण तालुक्यातील असरोंडी आणि आंबेरी याठिकाणी अनधिकृतपणे गौण खनिज अर्धा जांभा दगडाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदारांनी कारवाई करत लाखो रूपयांची मशिनरी सील केली आहे. असरोंडीत
राजेश सावंत, संदीप सावंत, नयन राणे, विनायक मेस्त्री या चार जणांवर तर आंबेरीत सागर गोवेकर याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत असरोंडी येथील राजेश मधुकर सावंत यांचे दोन टिलर १ जेसीबी, १ आयव्ही मशिन, चार डंपर, संदीप रामचंद्र सावंत यांची एक मशिन, कटर, नयन भास्कर राणे यांची एक मशिन, दोन टिलर, एक इंपर, विनायक भालचंद्र मेस्त्री यांची मशिन, टिलर, कटर तर आंबेरी येथील सागर चंद्रकांत गोवेकर यांची जेसीबी, जनरेटर, १२० ब्रास जांभा दगडावर कारवाई करत लाखो किमतीचे साहित्य सील केले.

 

Web Title: Sindhudurg: The action of the five irregularities of the revenue, and the penalty will be taken against the miners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.