सिंधुुदुर्ग : आनंदवाडीचे काम लवकरच सुरु करणार : अरुण विधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:45 PM2018-06-06T15:45:27+5:302018-06-06T15:45:27+5:30

देवगड येथील आनंदवाडी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टीकोनातून येथील मच्छिमार व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अरूण विधळे यांनी केले.

Sindhudurg: Anandvadi's work to commence soon: Arun Vidal | सिंधुुदुर्ग : आनंदवाडीचे काम लवकरच सुरु करणार : अरुण विधळे

आनंदवाडी प्रकल्पाबाबत मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अरूण विधळे यांनी मच्छिमारांशी चर्चा केली. (छाया : वैभव केळकर)

googlenewsNext
ठळक मुद्देआनंदवाडीचे काम लवकरच सुरु करणार : अरुण विधळे प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी; ग्रामस्थांनी सहकार्य करावे

सिंधुुदुर्ग : देवगड येथील आनंदवाडी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टीकोनातून येथील मच्छिमार व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अरूण विधळे यांनी केले.

राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अरूण विधळे यांनी आनंदवाडी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या आराखड्याची ग्रामस्थांसमवेत पाहणी करून माहिती घेतली. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प करावयाचा असून यामुळे ग्रामस्थांचे व मच्छिमारांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सध्या या प्रकल्पाला राज्य व केंद्रशासनाची मंजुरी मिळाली असून येत्या काही दिवसांत निविदाप्रक्रिया पूर्ण होईल.

या प्रकल्पाचा सुधारीत आराखडा ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करण्यात आला असून त्यामुळे ग्रामस्थांची कोणतीही अडचण नाही. ग्रामस्थांच्या सुचनेनुसार सुधारीत आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू होण्याआधी ग्रामस्थांशी व मच्छिमारांशी चर्चा करून प्रकल्पस्थळाची पाहणी करण्यासाठी देवगडमध्ये आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त श्रीकांत वारुंजीकर, सहाय्यक पतन अभियंता उमेश बागुल, भाई खोबरेकर, देवगड फिशरमेन्स सोसायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे, तुषार पाळेकर, विलास रूमडे, मिलींद साटम, दिनेश पारकर, संतोष तारी, बाबू हिरनाईक, नटेश्वर धुरी आदी मच्छिमार व ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: Sindhudurg: Anandvadi's work to commence soon: Arun Vidal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.