सिंधुदुर्ग : इन्सुली येथे ३0 एप्रिल रोजी धार्मिक कार्यक्रम, गोमंत संत सोहिरोबानाथ दोन अंकी नाट्यप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:44 PM2018-04-28T15:44:43+5:302018-04-28T15:44:43+5:30

इन्सुली-डोबाशेळ येथील संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर साक्षात्कार दिन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sindhudurg: On April 30th, the religious program, Gomant Sant Sohirobanath, used to play two-digit drama on April 30. | सिंधुदुर्ग : इन्सुली येथे ३0 एप्रिल रोजी धार्मिक कार्यक्रम, गोमंत संत सोहिरोबानाथ दोन अंकी नाट्यप्रयोग

सिंधुदुर्ग : इन्सुली येथे ३0 एप्रिल रोजी धार्मिक कार्यक्रम, गोमंत संत सोहिरोबानाथ दोन अंकी नाट्यप्रयोग

googlenewsNext
ठळक मुद्देइन्सुली येथे ३0 एप्रिल रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनसंत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर साक्षात्कार दिन सोहळा

बांदा : इन्सुली-डोबाशेळ येथील संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर साक्षात्कार दिन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्र्रतिवर्षाप्रमाणे वैशाख शुध्द पौर्णिमेला सोमवार दिनांक ३० एप्रिल रोजी हा सोहळा होणार असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयानिमित्त आयोजित गोमंत संत सोहिरोबानाथ हा दोन अंकी नाट्यप्रयोग नाट्य रसिकांसाठी पर्वणी आहे.

सोमवारी सकाळी ६ वाजता श्रींची काकड आरती होणार आहे. सकाळी ८.३० वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक होईल. ९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजेस प्रारंभ होईल. त्यानंतर महाआरती होऊन तीर्थप्रसाद व महाप्रसादास सुरुवात होईल. सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत पालखी सोहळा होईल.

रात्री १० वाजता भार्गवी थिएटर पर्वरी-गोवा निर्मित महान संगित दोन अंकी नाट्यकृती गोमंत संत सोहिरोबानाथ सादर होणार आहे. भाविकांनी या सोहळ््याचा लाभ घेण्याचे आवाहन संत सोहिरोबानाथ सेवा समिती इन्सुलीच्यावतीने अध्यक्ष नंदू पालव, सचिव गुरुनाथ पेडणेकर, सर्व समिती सदस्य, उत्कर्ष युवक कला-क्रीडा व व्यायाम मंडळ, इन्सुली व नाथ भक्तांंनी केले आहे.

Web Title: Sindhudurg: On April 30th, the religious program, Gomant Sant Sohirobanath, used to play two-digit drama on April 30.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.