सिंधुदुर्ग : न्यायासाठी उपोषणाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:31 PM2018-03-24T15:31:14+5:302018-03-24T15:31:14+5:30

मालवण चिवला बीच येथील गुरुवारी महसूल प्रशासनाच्यावतीने हटविण्यात आलेल्या झोपडीवजा घरामुळे फर्नांडिस कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

Sindhudurg: Attempt of fasting for justice, district collector's attention | सिंधुदुर्ग : न्यायासाठी उपोषणाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार

मालवण येथील फर्नांडीस कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी नायब तहसीलदार सुहास खडपकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

Next
ठळक मुद्देन्यायासाठी उपोषणाचा इशाराजिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार स्वाभिमानसह ख्र्रिस्ती बांधव आक्रमक

मालवण : मालवण चिवला बीच येथील गुरुवारी महसूल प्रशासनाच्यावतीने हटविण्यात आलेल्या झोपडीवजा घरामुळे फर्नांडिस कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे केलेल्या कारवाईबाबत दहा दिवसांत प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडू, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार सुहास खडपकर यांना दिले.

चिवला बीच येथे झोपडीवजा घर हटविण्यात आल्याने फर्नांडिस कुटुंबीय रस्त्यावर आले असून त्यांचे हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी निवासी तहसीलदार सुहास खडपकर यांची भेट घेत स्थानिक नागरिकांनी निवेदन सादर केले. यावेळी महेश जावकर, बाबा परब, शीला गिरकर, यतीन खोत यांच्यासह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसील प्रशासनाकडून करण्यात आलेली कारवाई मानवतेला काळिमा फासणारी आहे. अमानुष आणि बळजबरीने फर्नांडिस यांना बाहेर काढून केलेली कारवाई निषेधार्ह आहे. विश्वासात न घेता व पूर्व कल्पना न देता कारवाई केल्याने त्यांना बेघर व्हावे लागले आहे. शासनाकडून न्याय न मिळाल्यास मंत्रालय स्तरापर्यंत दाद मागू असे महेश जावकर यांनी सांगितले. यावेळी रविकिरण तोरसकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

जबाबदारी स्वीकारली

फर्नांडिस कुटुंबातील दोन मुले सध्या शालेय शिक्षण घेत असून त्यांच्या परीक्षा सुरू आहेत. यात बेघर झाल्याने या मुलांवर ओढवलेली परिस्थिती भयावह आहे. प्रश्नासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचेही लक्ष वेधणार असल्याचे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे. तर फर्नांडीस कुटुंबीयांच्या न्यायालयीन लढ्यासाठी तालुका श्रमिक मच्छीमार संघाच्यावतीने आर्थिक जबाबदारी स्वीकारली जाईल, असे विकी तोरसकर यांनी सांगितले.
 

Web Title: Sindhudurg: Attempt of fasting for justice, district collector's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.