सिंधुदुर्ग: बांबू हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पिक : के मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:23 PM2018-11-30T17:23:13+5:302018-11-30T17:25:40+5:30
कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
सिंधुदुर्गनगरी : कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजीत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर, कमलाकर रणदिवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बांबू लागवडीविषयी मार्गदर्शक मिलिंद पाटील आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
२0१८-१९ मध्ये बांबू लागवड अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, या अभियानासाठी ग्राम पातळीवरचे नियोजन महत्वाचे आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यासाठीचा परिपूर्ण नियोजन अराखडा तयार करावा. बांबूच्या जाती त्यांचे उत्पादन आणि त्यांचा शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याचे नियोजन तयार करावे. त्यामुळे अभियान यशस्वीरित्या पूर्ण करता येईल.
१0 डिसेंबर पर्यंत तालुका स्तरावर बांबू लागवडी विषयी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. ४ लाख बांबू लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप यांनी या अभियानाची थोडक्यात महिती दिली. तर मिलिंद पाटील यांनी बांबू लागवडी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील बांबूची लागवड, त्याचे अर्थकारण व फायदेही सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी प्रस्तावनेत बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेचा उद्देश व या अभियानाची माहिती दिली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी शेतकऱ्यांसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे सांगून या अभियानासाठी शुभच्छा दिल्या. सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.