सिंधुदुर्ग : आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्यात यशस्वी होऊ : आप्पासाहेब शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:57 AM2018-11-06T11:57:31+5:302018-11-06T12:00:46+5:30

आॅनलाईन औषध विक्रीमुळे देशातील तरुणवर्गाला नशेची औषधे सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे नशेच्या आहारी जाऊन देशाची तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे. यासाठी आपण लढा पुकारला असून न्यायालयात दावा दाखल केल्यावर न्यायालयाने आॅनलाईन औषध विक्रीवर स्थगिती आणली असून लढा तीव्र करून अशा औषध विक्रीवर बंदी आणण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास आॅल इंडिया केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार आप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला.

Sindhudurg: To be successful in banning online drug sales: Appasaheb Shinde | सिंधुदुर्ग : आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्यात यशस्वी होऊ : आप्पासाहेब शिंदे 

आॅल इंडिया केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार आप्पासाहेब शिंदे यांचे स्वागत जिल्हा व तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

Next
ठळक मुद्देआॅनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्यात यशस्वी होऊ  : आप्पासाहेब शिंदे सरकारने विक्रीवर बंदी आणणे गरजेचे

मालवण : आॅनलाईन औषध विक्रीमुळे देशातील तरुणवर्गाला नशेची औषधे सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे नशेच्या आहारी जाऊन देशाची तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे. यासाठी आपण लढा पुकारला असून न्यायालयात दावा दाखल केल्यावर न्यायालयाने आॅनलाईन औषध विक्रीवर स्थगिती आणली असून लढा तीव्र करून अशा औषध विक्रीवर बंदी आणण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास आॅल इंडिया केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार आप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आप्पासाहेब शिंदे यांनी मालवणला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे खजिनदार वैजनाथ जागुस्टे, सहसचिव प्रसाद दानवे, जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, रत्नागिरीचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार उबाळे, मुंबई विभागाचे उपाध्यक्ष अनिल पाटकर, मालवण तालुकाध्यक्ष शेखर सुपल, उपाध्यक्ष विद्यानंद परब, जिल्हा सहसचिव छोटू तारी, जिल्हा सदस्य दत्तात्रय पारधिये, तालुका सचिव ओंकार मांजरेकर, संघटक सचिव अमेय पारकर, कणकवली अध्यक्ष विवेक आपटे, नगरसेवक दीपक पाटकर, प्रसाद तेरसे, राहुल कुलकर्णी, विशाल आचरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, औषध ही संजीवनी असली तरी ते विषही आहे. औषधांची विक्री करताना सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य आपल्या हाती आहे याची जाणीव मेडिकल व्यावसायिकांनी ठेवली पाहिजे. आपल्याकडून ग्राहकांना चुकीची औषधे दिली जाता नयेत याची खबरदारी घेतली पाहिजे. भारत हा तरुणांचा देश आहे. मात्र, ही तरुण पिढी सोशल मीडियात अडकली असून ड्रग्ज व नशेच्या आहारी जात आहे.

आॅनलाईन विक्री स्थळांवरून नशेची औषधे तरुणांना सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांमध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढतच चालले असून यात देशाचे भवितव्य असणारी तरुण पिढी बरबाद होत आहे. गर्भपात करण्याच्या गोळ्याही आॅनलाईन खरेदी केल्याच्या गंभीर घटना घडत आहेत. आॅनलाईन औषध विक्री कंपन्यांच्या या सेवेचा समाजात गैरवापर व अनैतिक गोष्टी करण्यासाठी वापर होत आहे. त्यामुळे सरकारने आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी आणणे गरजेचे बनले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानंद परब यांनी केले.

न्यायालयीन लढा तीव्र करणार

सरकारने आॅनलाईनवर बंदी आणल्यावर आॅनलाईन औषध विक्रीतून होणारे गैरवापर रोखण्यात यश येईल. सरकारने केमिस्ट व ड्रॅगिस्ट व्यावसायिकांना कडक नियमावली लागू केली असून ग्राहकांना औषधे देताना व्यावसायिकांकडून योग्य ती खबरदारी व सतर्कता बाळगली जाईल.

आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी आणण्यासाठी आॅल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे न्यायालयात दावा दाखल केला असून न्यायालयाने आॅनलाईन औषध विक्रीला स्थगिती आणली आहे. याबाबतचा लढा तीव्र करणार असून न्यायालय आपल्या बाजूने निर्णय देईल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.

Web Title: Sindhudurg: To be successful in banning online drug sales: Appasaheb Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.