सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक, जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची चर्चा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:21 PM2022-01-11T12:21:38+5:302022-01-11T12:22:12+5:30
या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कणकवली : सिंधुदुर्गभाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक उद्या, बुधवार (१२ जानेवारी) रोजी दुपारी ३ वाजता महिला भवन ओसरगाव, कणकवली येथे होणार आहे. या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला सर्व भाजप जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मोर्चा, आघाडी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस व पदाधिकारी यांनी वेळेत बैठक स्थळी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.
दरम्यान, नुकत्याच अटीतटीच्या झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक निवडणुकीच्या निमित्ताने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत जिल्हा बँक अध्यक्ष निवडीविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.