सिंधुदुर्ग : स्वस्त दुचाकीचे आमिष, २७ लाख रुपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:36 PM2018-03-08T17:36:10+5:302018-03-08T17:36:10+5:30
कमी वेळेत व स्वस्त किमतीत शोरूम मधुन दुचाकी देतो असे सांगून जिल्हावासियांना २७ लाख रूपयांचा गंडा घालणारा संशयित आरोपी शकिल रसुल ढलाईत (रा. इस्लामपूर जि. सांगली) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
सिंधुदुर्गनगरी : कमी वेळेत व स्वस्त किमतीत शोरूम मधुन दुचाकी देतो असे सांगून जिल्हावासियांना २७ लाख रूपयांचा गंडा घालणारा संशयित आरोपी शकिल रसुल ढलाईत (रा. इस्लामपूर जि. सांगली) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
ढलाईत या आरोपीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवून येथील लोकांना शोरूम मधुन स्वस्तात व कमी वेळेत दुचाकी वाहने घेवून देतो असे आमिष दाखवून तब्बल २७ लाख रूपयांची फसवणूक केली होती. व हा आरोपी जिल्ह्यातून फरार झाला होता. याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिंधुदुर्ग प्रमाणेच राज्यातील अन्य जिल्ह्य़ात अशाच प्रकारे नागरिकांची लुबाडणूक केली आहे. या आरोपींचा पोलीस शोध घेत असून या संशयित आरोपी पासून नागरिकांनी सजग रहावे व हा आरोपी दिसताच क्षणी सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपअधीक्षक एन. टी. मोरे, सिंधुनगरी पोलीस ठाणे यांना संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.