Chipi Airport Inauguration LIVE : "खोटं बोलणारी लोकं होती, त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं"

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 11:57 AM2021-10-09T11:57:55+5:302021-10-09T14:34:54+5:30

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने विमानाने गावी जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. ...

Sindhudurg Chipi Airport Inauguration Live Updares: CM Uddhav Thackeray and Narayan Rane to come together news in Marathi | Chipi Airport Inauguration LIVE : "खोटं बोलणारी लोकं होती, त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं"

Chipi Airport Inauguration LIVE : "खोटं बोलणारी लोकं होती, त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं"

Next

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने विमानाने गावी जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आज दुपारी एक वाजता हा लोकार्पण सोहळा होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे गेल्या महिन्यातील वादंगानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. सिंधुदुर्गात जवळपास एक दशकापासून चिपी विमानतळाचे काम सुरू होते. नारायण राणे काँग्रेसमध्ये मंत्री असताना या विमानतळाचे काम सुरु करण्यात आले होते. भूमीपूजन झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात हे काम रेंगाळले होते. त्यानंतर शिवसेनेच्या काळात हे काम पूर्णत्वास गेले. यामुळे विमानतळाचा विकास कोणी केला यावरून नारायण राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयवाद सुरू होता. त्यानंतर आज चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. Sindhudurg Chipi Airport Inauguration Live Updares: CM Uddhav Thackeray and Narayan Rane to come together news in Marathi

LIVE

Get Latest Updates

02:32 PM

विकासामध्ये कुठेही मी पक्षभेद आणत नाही... तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला, तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी सही केली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

02:32 PM

लघु का असेना, सूक्ष्म का असेना पण मोठं खातं तुमच्याकडे आहे... त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 

02:29 PM

कोकणची जनता मर्द आहे आणि हक्काचा माणूस म्हणून विनायक राऊत यांना खासदार केले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 

02:28 PM

खोटं बोलणारी लोकं होती, त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 

02:27 PM

नजर लावू नये म्हणून काळा टिका लावावा लागतो... तशीही काही माणसं आहेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

02:25 PM

चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा मानस - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 

02:25 PM

02:24 PM

सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, नाही तर कुणीतरी म्हणेल मीच बांधला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 

02:23 PM

कोकणचा कॅलिफोर्निया करू असं अनेक जण म्हणाले होते... पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

02:20 PM

आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही तर आनंद साजरा करण्याचा आहे, माझ्यासाठी मोठा सौभाग्याचा दिवस - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 

02:17 PM

मराठी माणसाचा हा गौरवशाली इतिहास आहे. माझ्यासाठी हा भावूक क्षण आहे. ठाकरे आणि नारायण राणेंना निवेदन करतो, सिंधुदुर्ग  धरतीवर नवी मुहूर्तमेढ रोवत आहोत. हे केवळ विमानतळाचं उद्घाटन नाही, इथे नवा इतिहास, नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे - ज्योतिरादित्य सिंधिया

02:10 PM

लोकप्रतिनिधी काय करतात त्यासाठी कोणाला तरी नेमा, सुशोभीकरणासाठी पैसे द्या, अजित दादा पैसे द्या - नारायण राणे
 

02:09 PM

जे चाललंय ते एमआयडीसी 80 टक्के माझा अंतर्गत आहेत, समुद्र किनारी कोणते उद्योग येतात ते आणणार - नारायण राणे
 

02:08 PM

माझ्या दृष्टीने आदित्य टॅक्स फ्री आहेत, मी बोलणार नाही. मी शुभेच्छा देईन. उद्धवजींना अभिप्रेत काम करुन दाखवा, मला आनंद वाटेल. सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही सर्व आलात आनंद आहे - नारायण राणे
 

02:05 PM

चांगल्या मनानी या, आनंद लुटा, जिल्ह्याची चांगली डागडुजी करून दाखवा - नारायण राणे
 

02:01 PM

कुठे आहे विकास, आजही पाणी नाही, विमानतळावर उतरल्यावर लोकांनी काय पाहावं, रस्त्यावरचे खड्डे पाहावे का? - नारायण राणे
 

01:58 PM

आदित्य ठाकरे यांनी इथला अभ्यास करावा. माझ्यावेळी धरणाची कामं झाली - नारायण राणे
 

01:54 PM

साहेबांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी दिले - नारायण राणे
 

01:46 PM

या विमातळाचा इतिहास मोठा आहे. एकट्या दुकट्याने काही होत नाही. कोकणाला निसर्गाचं वरदान आहे. कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. आता सध्या अडीच किमीचा रन वे आहे. साडेतीन किमीचा रन वे होऊ शकतो - अजित पवार

01:42 PM

पर्यटनावर भर देताना पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याकडेही अधिक लक्ष देणार - आदित्य ठाकरे

01:38 PM

कोकण जगभरात पर्यटनाचे केंद्रबिंदू, पण जगातील पर्यटक कोकणात कसा येईल, यावर भर देणार - आदित्य ठाकरे

01:37 PM

सिंधुदुर्ग हा पर्यटनाचाच जिल्हा आहे, येथे पर्यटनाची मोठी क्षमता, संपूर्ण कोकणवासीयांकडे खरोखरच आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण  - आदित्य ठाकरे

01:36 PM

विमानातून येताना कोकणाचे अद्भूत सौंदर्य पाहिले, प्रत्येक आठवड्यात कोकणासाठी काय करू शकतो, याकडे लक्ष देणार - आदित्य ठाकरे

01:28 PM

चिपी विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित.

01:21 PM

"कोकणवासीयांची जी स्वप्न आहेत ती साकार होतील"

कोकणवासीयांचा उत्कर्ष होईल. सर्वांनी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केलं तर काय होतं हे या विमानतळाच्या दृष्टीनं दिसून येतं. कोकणवासीयांची जी स्वप्न आहेत ती साकार होतील, पर्यटन वाढेल. आज पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत. गाडीसाठी ५ हजार रूपये लागतात. परंतु यासाठी भारत सरकार आणि केंद्राच्या अनुदानातून २४०० रूपयांत प्रवास करता येणार आहे हे नक्कीच दिलासादायक आहे - सुभाष देसाई
 

01:19 PM

"आज प्रयत्नांना यश मिळालं"

उद्धव ठाकरेंच्या रुपानं ते काम पूर्ण झालं. विनायक राऊन यांनी पाठपुरावा केला. एमआयडीसीने यासाठी पाणीपुरवठा, वीजपुरवठा, भूसंपादन ही प्रक्रिया पूर्ण झाली. आज हे काम पूर्ण झालं. आज प्रयत्नांना यश मिळालं - सुभाष देसाई
 

01:16 PM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीहून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित. खासदार विनायक राऊत हे सूत्रसंचालन करीत त्यांनी सर्वांचे स्वागत केले.

01:13 PM

चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकत्र आले. यावेळी दोघं हास्यविनोद करताना...

01:10 PM

"काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडस करू नये"

01:01 PM

"शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही"

प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधीची भूमिका बजावणाऱ्या आमच्यासारख्या सर्वांनाच आजचा दिवस आनंदाचा आहे. शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही. 1999 साली विमानतळाची सुरुवात झाली. 2003 साली पहिलं आणि 2009 साली दुसरं भूमिपूजन झालं. त्यांनी भूमिपूजन करण्याचं काम अनेकदा केलं. पण खऱ्या अर्थाने विमानतळाच्या कामाला सुरुवात 2016 पासून झाली - विनायक राऊत 

12:47 PM

"आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार"

स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडसच करू नये. शिवसेनेनं गेल्या दोन वर्षांत ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात काम केलंय, ते पाहाता आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार आहोत. आम्हाला घाबरण्याचं कारण नाही - विनायक राऊत 

12:32 PM

"मुख्यमंत्री ठाकरे एकाच मंचावर असतील, ही चांगली गोष्ट"

आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. राजकारण केले जाणार नाही. उद्घाटनाला कोणतेही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील, ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षाने हा योग आला - नारायण राणे

12:20 PM

केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत.

12:20 PM

मुख्यमंत्री चिपी विमानतळावर दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळावर दाखल, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरातही उपस्थित
 

12:18 PM

“चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही”

12:10 PM

नारायण राणे सहकुटुंब चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी रवाना

12:07 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे मुंबई विमानतळावर दाखल

12:03 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी १.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे चिपी-परुळे येथील विमानतळाचे उद्घाटन

Web Title: Sindhudurg Chipi Airport Inauguration Live Updares: CM Uddhav Thackeray and Narayan Rane to come together news in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.