सिंधुदुर्ग: बांधकामचे अधिकारीच बनले ठेकेदार, सावंतवाडी पंचायत समिती बैठकीत सदस्य आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:26 PM2018-08-08T16:26:56+5:302018-08-08T16:30:47+5:30
आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.याची सखोल चौकशी करा तसेच आबोली घाटात संरक्षक कठडे कोसलेत साईडपट्टी नाही एखादा पोलदपूर सारखा अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्याकडून करण्यात आला.
आंबोली :आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.याची सखोल चौकशी करा तसेच आबोली घाटात संरक्षक कठडे कोसलेत साईडपट्टी नाही एखादा पोलदपूर सारखा अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्याकडून करण्यात आला.अधिकारीच ठेकेदार बनल्याने आबोलीची दुरव्यवस्था झाली असा आरोप ही यावेळी करण्यात आला आहे.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक बुधवारी सभापती रविंद्र मडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गेळे येथील ग्रामपंचायत कक्षात पार पडली.यावेळी गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही.एन.नाईक, जिल्हा परीषद सदस्या रोहिणी गावडे, एस.एस.अदाण्णवर, संदेश राणे, पंचायत समिती सदस्य संदिप तळवणेकर, मोहन चव्हाण, रूपेश राउळ, पकज पेडणेकर, श्रीकृष्ण सावंत, शितल राउळ, मेघश्याम काजरेकर, प्राजक्ता केळूस्कर, मानसी धुरी, अक्षया खडपे, मनिषा गोवेकर, गौरी पावस्कर, रेश्मा नाईक, श्रृतिका बागकर, सुनंदा राउळ, कक्ष अधीक्षक मृणाल कार्लेकर, कक्ष अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदि उपस्थीत होते.
यावेळी सदस्य मोहन चव्हाण यानी आबोली कुभवडे रस्त्यावर विद्यूत वाहिन्या खाली आल्याने एसटी बस अडकून पडल्या याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थीत केला तसेच आंबोलीसाठी वायरमन ची संख्या वाढवा सध्या एका वायरमन वर काम चालू आहे.
वाढीव विज बिले कमी करण्या बाबत विज वितरण विभागाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसा ठराव ही घेण्यात आला.तर आरोग्य विभागा बाबत काही वैद्यकीय अधिकारी रूग्णालयातच खाजगी सेवा देतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात अशावर कारवाई करावी अशी मागणी सदस्य राउळ यांनी केली तर सदस्या गोवेकर यांनी वैद्यकीय अधिकारी एकाच मेडिकल मधून औषधे घेण्यास कसे सागतात त्याना काय अधिकार यांची ही चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे.त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी आपण याबाबत चौकशी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करू असे सागिंतले.
अनधिकृत पणे गावात कोणते ही कॅम्प घेतात त्याची सर्व माहीती ग्रामपंचाय कडे असावी अन्यथा कोण ही गावात येउन काही करू शकतात तसे अनोळखी व्यक्ती एखाद्याच्या घरात घुसल्यास जबाबदार कोण असा सवाल पंचायत समिती सदस्या गोवेकर यांनी केला त्यावर सभापती मडगावकर यांनी गटविकास अधिकारी यांनी सरपंचाच्या बैठकीत याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांना माहीती द्यावी व गावात एखादा कॅम्प किवा शिबीर झाले तर त्याची नोंद ग्रामपंचायत कडे असावी असे निर्बध घालावे असे सांगण्यात आले.
या बैठकीत आंबोलीतील रस्ते तसेच घाटातील संरक्षक कठड्यावरून चांगलाच वादंग झाला बांधकाम चे शाखा अभियता इफ्तेकर मुल्ला यांना सर्वच सदस्यांनी धारेवर धरले आंबोलीत एक ही रस्ता चांगला नाही रस्त्यावर डांबर नाही.घाटात संरक्षक कठडा नाही साईड पट्या नाही एखादी पोलादपूर सारखी घटना तर त्याला कोण जबाबदार आंबोली यावर्षो केलेले काम पुढच्या वर्षो नसते अधिकारीच ठेकेदार झाले आहेत.
रात्रीच्या वेळी वाहाने घाटातून कशी चालावयची गेळे रस्ता बघा कावळेसाद कडे जाणारे रस्ते बघा कुठच्या ही रस्त्याना साईडपट्या नाही मग पैसा कुठे खर्च केला जातो कोणाच्या घशात जातो असा सवाल ही सर्वच सदस्यानी केला बांधकामच्या कार्यपध्दतीवर सदस्यानी चांगलेच तोडसुख घेतले नंतर सभापती मडगावकर यानी त्यात मध्यस्थी करत आंबोलीतील कामाच्या चौकशीचा ठराव घेण्याचे ठरवण्यात आले या बैठकीत जिल्हापरीषद बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता विनायक चव्हाण यान रूपेश राउळ यानी धारेवर धरले.
या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली बैठकीच्या सुरूवातीला राजमाता सत्वशिलादेवी भोसले मेजर कैस्तूभ राणे आदिना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तर मराठा समाज्याला आरक्षण मिळावे म्हणून खासदार विनायक राउत यांनी संसदेत मराठीतून भाषण केल्याबद्दल त्याच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.बैठकीचे नियोजन गेळे सरपंच अर्जून कदम याच्यासह सदस्य ग्रामसेवक यांनी केले त्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.