सिंधुदुर्ग : सुरंगकळीला बाजारभाव कमी, जादा भाव देण्याची व्यावसायिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:35 PM2018-03-19T15:35:44+5:302018-03-19T15:35:44+5:30

रेडी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सुरंगकळीचे उत्पादन घेतात. साधारण मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत चालणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय म्हणून महत्त्वाचा ठरतो. मात्र या व्यवसायासाठी लागणारे श्रम, कालावधी आणि खर्चाच्या तुलनेत बाजारपेठेतील भाव कमी असल्याने सुरंगकळीचा भाव चढ्या दराने वाढवून मिळावा, असा सूर बागायतदार, मजूरवर्ग आणि महिला विक्रेत्यांतून उमटत आहे.

Sindhudurg: The demand of the businessmen to reduce the cost of the train to the sub-market | सिंधुदुर्ग : सुरंगकळीला बाजारभाव कमी, जादा भाव देण्याची व्यावसायिकांची मागणी

सिंधुदुर्ग : सुरंगकळीला बाजारभाव कमी, जादा भाव देण्याची व्यावसायिकांची मागणी

Next
ठळक मुद्देसुरंगकळीला बाजारभाव कमी, बागायतदार, मजूरवर्गाची व्यथा जादा भाव देण्याची व्यावसायिकांची मागणी

बाळकृष्ण सातार्डेकर

रेडी : रेडी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सुरंगकळीचे उत्पादन घेतात. साधारण मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत चालणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय म्हणून महत्त्वाचा ठरतो. मात्र या व्यवसायासाठी लागणारे श्रम, कालावधी आणि खर्चाच्या तुलनेत बाजारपेठेतील भाव कमी असल्याने सुरंगकळीचा भाव चढ्या दराने वाढवून मिळावा, असा सूर बागायतदार, मजूरवर्ग आणि महिला विक्रेत्यांतून उमटत आहे.

यावर्षीच्या हंगामात गेले तीन ते चार दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येथील वातावरण दमट, ढगाळ झाले. तसेच रात्रीच्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने वाढलेल्या सुरंगकळीच्या फुलावर बारीक किडीचा प्रादुर्भाव तसेच काबरी पडण्याची भीती असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

साधारण मार्च व एप्रिल महिन्यांच्या कालावधीत सुरंगकळी व फुलून आलेल्या फुलांचे उत्पादन मिळते. कळी व फुलांवर उन्हात सुकविण्याची प्रक्रिया करून नजीकच्या बाजारपेठेत विक्री त्यांची केली जाते. त्यामुळे या हंगामाची आतुरतेने वाट पाहिली जाते.

यावर्षी थंडीची लाट मोठी आल्याने दरवर्षीपेक्षा जास्त सुरंगकळीचे उत्पादन आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत अधिक भाव मिळण्याच्या आशेवर रेडी पंचक्रोशी परिसरात कळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी खटाटोप सुरू आहे.

महिलावर्गाकडून सुरंगीच्या फुलांपासून उत्कृष्ट हार, वळेसार, गजरे बनवून विक्रीसाठी शिरोडा, आरोंदा येथील बाजारपेठेत आणले जातात. तसेच गावातील देवतांच्या पाषाणमूर्तिंना सुरंगीच्या हारांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात येते.

कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या आरवली गावचे दैवत श्री देव वेतोबाची सुरंगीच्या हारांनी पूजा केली जाते. त्यामुळे परिसरात सुरंगीच्या हारांना मोठी मागणी आहे.

सुरंगीचा भाव वाढत असला तरी हे काम जोखमीचे असल्याने रेडीसारख्या पर्यटन व भौगोलिक गावात या कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर पर्याय म्हणून व्यावसायिकांची कुटुंबे सकाळपासूनच सुरंगीची फुले काढण्याच्या कामास लागत आहेत.

सुरंगीच्या झाडाखाली गोणपाट, जुन्या साड्या, चादर, सतरंजी, प्लास्टिक ताडपत्री पसरून सुरंगकळी व फुले पाडली जातात. ती उन्हात किमान सात ते आठ वेळा वाळवून चांगल्याप्रकारे बंद करून विक्री केली जाते. हा व्यवसाय मार्च ते मे महिन्यापर्यंत चालतो.

रेडी, शिरोडा, आरोंदा, आसोली, वेळागर, आरवली-टांक, सोन्सुरे, मोचेमाड, न्हैचिआड, अणसूर, तळवणे, आजगाव, मळेवाड या भागातील लोक मोठ्या प्रमाणात सुरंगकळीचे उत्पादन घेताना दिसत आहेत. यावर्षी वेळेत थंडी सुरू झाल्याने सुरंगकळीचे उत्पादन चांगले आले आहे. 

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रतिकिलो ५०० रुपयेपर्यंत भाव मिळत होता. पण उष्म्याची लाट वेगाने आल्याने कळीच्या उत्पादनाला अधिक वेग आला. त्यामुळे १०० रुपयांची घट होऊन प्रतिकिलो ४०० रुपये भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या बाजारात सुरंगकळी प्रतिकिलो ३८० ते ४०० रुपये व वाळविलेले फूल २५० रुपये प्रति किलो दराने खरेदी केले जात आहे. सुरंगकळीचे वळेसार, गजरे २० ते २५ रुपये किमतीने विकले जातात. तर कळी काढणारे मजूर ५०० ते ६०० रुपयांपर्यंत रोजंदारीचे काम करीत आहेत.

दृष्टीकोन बदलतोय; देश-विदेशात सुरंगीला मागणी

च्सुरंगकळीचा उपयोग सुगंधी तेल, अगरबत्ती, उत्तम प्रतीचे अत्तर, सुगंधी साबण, केसासाठी लागणारी जेल, उत्तम दर्जाचा रंग बनविण्यासाठी कंपन्यांमध्ये केला जातो. त्यामुळे सुरंगकळीला देश-विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुरंगकळी आणि फुलांच्या वाढत्या मागणीमुळे या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलू लागला आहे.

पूर्वी कवडीमोलाने विक्री होणाऱ्या सुरंगकळीला आता चांगला भाव मिळत असल्याने रेडी, शिरोडा पंचक्रोशीतील शेतकरी व बागायतदार सुरंगकळी वाया न घालविता जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चांगला दर मिळत असल्याने या व्यवसायाकडे रोजगाराचे साधन म्हणूनही पाहिले जात आहे.

यावर्षी सुरंगकळीचे उत्पादन चांगले आले आहे. त्यामुळे दोन ते तीन महिने का असेना, आम्हांला रोजंदारी मिळत असल्याने समाधान वाटत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर ग्रामीण भागातील हा व्यवसाय अवलंबून आहे. तसेच सुरंगीच्या झाडांची लागवड होणे गरजेचे आहे. तरच हा व्यवसाय वाढू आणि टिकू शकतो.
-प्रेमानंद पांडजी,
रेडी-म्हारतळेवाडी

बदलत्या वातावरणामुळे तसेच अवकाळी पडणारा पाऊस, उष्ण-दमट व ढगाळ हवामान यामुळे कळी व फुलांवर रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव होतो. तसेच मिळणारा बाजारभाव, मेहनत, मजुरी ही खर्चाच्या तुलनेत फारच कमी असल्याने याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. सुरंगकळी व वाळविलेल्या फुलाला शासन स्तरावर योग्य बाजारभावाची बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे.
-प्रसाद शांताराम रेडकर,
व्यावसायिक

 

Web Title: Sindhudurg: The demand of the businessmen to reduce the cost of the train to the sub-market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.