सिंधुदुर्ग : सावंतवाडी पंचायत समितीच्या उपसभापती नेमळेकरच, काँग्रेस सदस्यांनी व्हीप डावलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 06:08 PM2018-12-05T18:08:48+5:302018-12-05T18:10:37+5:30

काँग्रेस कडून व्हीप बजावण्यात आल्या नंतर सुद्धा अपेक्षेप्रमाणे अखेर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी संदीप नेमळेकर यांची निवड झाली तर काँग्रेसकडून उभ्या करण्यात आलेल्या मनिषा गोवेकर यांना सहा मतांवर समाधान मानावे लागले.आता पुढे कोणते राजकारण रंगते याची उत्सुकता सत्ताधाऱ्यासह विरोधकात आहे.

Sindhudurg: Deputy Chairman of Sawantwadi Panchayat Samiti | सिंधुदुर्ग : सावंतवाडी पंचायत समितीच्या उपसभापती नेमळेकरच, काँग्रेस सदस्यांनी व्हीप डावलला

सिंधुदुर्ग : सावंतवाडी पंचायत समितीच्या उपसभापती नेमळेकरच, काँग्रेस सदस्यांनी व्हीप डावलला

googlenewsNext
ठळक मुद्देसावंतवाडी पंचायत समितीच्या उपसभापती नेमळेकरच काँग्रेस सदस्यांनी व्हीप डावलला पक्षाकडून डावलल्याने बंडखोरीचा निर्णय घेतला : गोवेकर

सिंधुदुर्ग : काँग्रेस कडून व्हीप बजावण्यात आल्या नंतर सुद्धा अपेक्षेप्रमाणे अखेर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी संदीप नेमळेकर यांची निवड झाली तर काँग्रेसकडून उभ्या करण्यात आलेल्या मनिषा गोवेकर यांना सहा मतांवर समाधान मानावे लागले.आता पुढे कोणते राजकारण रंगते याची उत्सुकता सत्ताधाऱ्यासह विरोधकात आहे.

सावंतवाडी पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची निवडणूक बुधवारी झाली. यात काँग्रेसच्यावतीने आपल्या तिकीटावर निवडून आलेल्या सदस्यांना व्हीप बजावण्यात आला होता. त्यात दोन अर्ज आले होते.

यात देण्यात आलेला व्हीप वाचून दाखविण्यात यावा अशी मागणी मनिषा गोवेकर यांनी केली तर त्याला सदस्य रवींद्र मडगावकर यांनी विरोध केला. तर हा पक्षाचा विषय असल्यामुळे आपण वाचू शकत नाही असे सांगितले. त्यानंतर झालेल्या मतदान प्रक्रियेत सहा विरूध्द नऊ अशा प्रकारे संदीप नेमळेकर हे विजयी झाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब,माजी सभापती प्रमोद सावंत, रवींद्र मडगावकर, शेखर गावकर, प्रमोद गावडे, सुधीर आडिवरेकर, श्रीकृष्ण सावंत, रुपेश राऊळ, घनश्याम काजरेकर,पंकज पेडणेकर, संदीप गावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg: Deputy Chairman of Sawantwadi Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.