सिंधुदुर्ग : ढोलताशांच्या गजरात देवगडवासीयांनी शोभायात्रेतून पारंपरिकता जपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:10 PM2018-03-19T15:10:55+5:302018-03-19T15:10:55+5:30
ढोलताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर पारंपरिकता जपणारा वेश परिधान करून विविधतेने नटलेली अशी शोभायात्रा गुढीपाडव्यानिमित्त देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळामार्फत काढण्यात आली. जामसंडे दिर्बादेवी मंदिराकडून ही शोभायात्रा काढण्यात आली.
सिंधुदुर्ग : ढोलताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर पारंपरिकता जपणारा वेश परिधान करून विविधतेने नटलेली अशी शोभायात्रा गुढीपाडव्यानिमित्त देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळामार्फत काढण्यात आली. जामसंडे दिर्बादेवी मंदिराकडून ही शोभायात्रा काढण्यात आली.
देवगडमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्यावतीने संपूर्ण विविधतेने नटलेला आणि पारंपरिकता जपणारा मराठमोळा कार्यक्रम पार पडला.
आकर्षक चित्ररथ, पारंपरिकता व संस्कृतीचा आविष्कार असलेली वेशभूषा, पुरुषांबरोबरच महिलांचाही असलेला प्रतिसाद अशी भव्यदिव्य शोभायात्रा किल्ला हनुमान मंदिर ते देवगड स्वामी समर्थ मंदिर अशी काढून समस्त देवगडवासीयांनी गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे जल्लोषी स्वागत केले.
संपूर्ण विविधतेने नटलेला व पारंपरिकता जपणारा मराठमोळा असा उत्सव देवगडवासीयांच्या साक्षीने पार पडला. महिलांचा सहभाग असलेल्या लेझिम पथकाचे खास नृत्य या शोभायात्रेत लक्षवेधी ठरले.
ढोलपथकाच्या तालावर लेझिम पथकाचा आविष्कार सादर करताना आकर्षक चित्ररथ हे दोन्ही शोभायात्रांचे खास आकर्षण ठरले. देवगड येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचा चित्ररथही शोभायात्रेत आकर्षण ठरला. देवगड किल्ला हनुमान मंदिरापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेची देवगड स्वामी समर्थ मंदिर येथे सांगता झाली.