सिंधुदुर्ग : व्यापारी जहाज मार्गिकेला मच्छिमारांचा आक्षेप, तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 05:42 PM2018-11-02T17:42:36+5:302018-11-02T17:50:32+5:30

व्यापारी जहाजांसाठी मार्गिका समुद्रामध्ये नियोजित राखीव क्षेत्र करण्याबाबत केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. याला भारतातील पारंपरिक तसेच यांत्रिकी मच्छिमार संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्व संघटनांना विश्वासात घेऊनच सरकारने अधिसूचना काढावी, अशी मागणी नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्यावतीने तहसीलदार समीर घारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Sindhudurg: Dispute to fishermen on merchant Ship Marg, request for Tehsildar | सिंधुदुर्ग : व्यापारी जहाज मार्गिकेला मच्छिमारांचा आक्षेप, तहसीलदारांना निवेदन

मच्छिमार प्रतिनिधींनी तहसीलदार समीर घारे यांना निवेदन दिले.

Next
ठळक मुद्देव्यापारी जहाज मार्गिकेला मच्छिमारांचा आक्षेपमच्छिमार संघटनांना विश्वासात घेऊन अधिसूचना काढा!तहसीलदार समीर घारे यांना निवेदन

मालवण : व्यापारी जहाजांसाठी मार्गिका समुद्रामध्ये नियोजित राखीव क्षेत्र करण्याबाबत केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. याला भारतातील पारंपरिक तसेच यांत्रिकी मच्छिमार संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्व संघटनांना विश्वासात घेऊनच सरकारने अधिसूचना काढावी, अशी मागणी नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्यावतीने तहसीलदार समीर घारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

एनएफएफकडून मागील दोन महिन्यांपासून केंद्र सरकारच्या संबंधित खात्याकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र केंद्राकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातील विविध मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार घारे यांची भेट घेत संभावित विषयावर तीव्र आक्षेप नोंदविला. यावेळी श्रमिक मच्छिमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, बाबी जोगी, राजू परब, श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर व रमेश धुरी उपस्थित होते.

 

Web Title: Sindhudurg: Dispute to fishermen on merchant Ship Marg, request for Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.