Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 11:12 AM2021-12-30T11:12:41+5:302021-12-30T11:13:11+5:30

सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Sindhudurg Districk Bank Election Controversy between Satish Sawant and Pragya Dhawan at Kankavali polling station | Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची

Sindhudurg Districk Bank Election : कणकवलीत मतदान केंद्रावर सतीश सावंत, प्रज्ञा ढवण यांच्यात बाचाबाची

Next

कणकवली : कणकवली तहसील केंद्रावर जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाच्या महिला उमेदवार प्रज्ञा ढवण आणि जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रकरण मिटविले.

सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसील कार्यालयाबाहेर विकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते एका बुथवर तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या बुथवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

कणकवलीत १६५ मतदार असल्याने त्या मतदारांना मतदान केंद्रांमध्ये आणण्यासाठी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. आतापर्यंत कणकवली ४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

भाजपा बूथ वर नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषद सदस्य सायली सावंत, माजी उपसभापती संतोष कानडे, महेश गुरव, सोनू सावंत, मेघा गांगण, अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, बाबू गायकवाड, बंडू हर्णे, किशोर राणे, स्वप्निल चिंदरकर, आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg Districk Bank Election Controversy between Satish Sawant and Pragya Dhawan at Kankavali polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.