सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रौ १२ वाजलेपासून मनाई आदेश
By admin | Published: May 13, 2017 12:07 PM2017-05-13T12:07:29+5:302017-05-13T12:07:29+5:30
ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरु
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे दिनांक १३ मे २0१७ रोजी रात्रौ १२ वा. ते दिनांक २७ मे २0१७ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत या १५ दिवसांसाठी मनाई आदेश लागू केला आहे.
जिल्ह्यात तालुकावार नियोजित बहुजन क्रांतीमोर्चे, नगरपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणूका व ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणूक २0१७ प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यांसाठी तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको आंदोलनासारखे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडावेत, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा मनाई आदेश लागू केला आहे.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे दिनांक १३ मे २0१७ रोजी रात्रौ १२ वा. ते दिनांक २७ मे २0१७ रोजी रात्रौ १२ या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.