सिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 03:05 PM2018-10-04T15:05:43+5:302018-10-04T15:10:50+5:30

गेल्या सहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६९८ रक्तदान शिबिराद्वारे आॅगस्ट अखेरपर्यंत २९,७३६ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली आहे.

In Sindhudurg district, 9, 736 bags of blood collections were collected from 698 camps in six years | सिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलन

सिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलन

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गात सहा वर्षात ६९८ शिबिरातून २९,७३६ पिशव्या रक्त संकलनजिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती : रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग : गेल्या सहा वर्षात जिल्ह्यात ६९८ रक्तदान शिबिराद्वारे आॅगस्ट अखेरपर्यंत २९,७३६ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली आहे.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याची जाणीव ठेवत सिंधुदुर्गवासीयांनी रक्तदान शिबिरांना ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, विविध मंडळे यांच्या सहकार्यातून जिल्हा रूग्णालय आणि सिंधुदुर्ग रक्तपेढी केंद्रामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतली जातात.

 ३५0 मिलीची रक्तपिशवी (ब्लडबॅग) असते. संकलित करण्यात आलेल्या रक्तापैकी आतापर्यन्त २८,२४४ रक्तपिशव्या शासकीय व खासगी रूग्णालयातील रूग्णांना देण्यात आल्या आहेत. अपघातातील गंभीर जखमींना, अनेक आजारातील रूग्णांना, शस्त्रक्रिया झालेल्या गरोदर महिलांना तसेच अनेक शस्त्रक्रियांवेळी रूग्णांना रक्ताची गरज भासते. विविध गटातील दात्यांचे रक्त या रूग्णांचे प्राण वाचवत असते. अशा रुग्णांसाठी रक्तदाते हे देवदूतच ठरत असतात. वेळीच रक्त मिळाल्याने नवीन आयुष्य त्या रूग्णांना मिळते. त्यामुळे अन्नदान तसेच विविध दानांबरोबरच रक्तदानही तेवढेच महत्वाचे आहे.

सन २0१३ मध्ये १0५ शिबिरांद्वारे ५१६२ पिशव्या, सन २0१४ मध्ये ११५ शिबिरांद्वारे ५३१४ पिशव्या, सन २0१५ मध्ये १३३ शिबिरांद्वारे ५५६८ पिशव्या, सन २0१६ मध्ये १२६ शिबिरांद्वारे ५0८८ पिशव्या, सन २0१७ मध्ये १३२ कॅम्पद्वारे ५२२१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. तर १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ८७ शिबिराद्वारे ३३८३ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले आहे.

ब्लड आॅन कॉल अर्थात जीवन अमृत सेवा योजनेंतर्गत सन २0१३ मध्ये ४७0 पिशव्या, सन २0१४ मध्ये ७२५ पिशव्या, सन २0१५ मध्ये ९७८ पिशव्या, सन २0१६ मध्ये ९८९ पिशव्या, सन २0१७ मध्ये ८६७ पिशव्या आणि सन २0१८ मध्ये ४४८ पिशव्या रक्त हे गरजू रूग्णांना देण्यात आले.

ब्लड मोबाईल बसमधून तीन वर्षात २५७१ पिशव्यांचे संकलन

वातानुकुलीत ब्लड मोबाईल बस ही सन २0१५ मध्ये राज्य रक्त संक्रमन परिषद मुंबई यांच्याकडून जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीला प्राप्त झाली. ही बस सन २0१६ पासून रक्तपेढी विभागामध्ये कार्यरत आहे.

सन २0१६ मध्ये या बसद्वारे ११ शिबिरांद्वारे ६९५ रक्तपिशव्या, सन २0१७ मध्ये १५ शिबिराद्वारे ८७८ पिशव्या, सन २0१८ मध्ये १२ शिबिरांद्वारे ९९८ अशा मिळून तीन वर्षात २५७१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

Web Title: In Sindhudurg district, 9, 736 bags of blood collections were collected from 698 camps in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.