सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका ;अनेक घरात घुसले पाणी,लाखोंचे नुकसान, महामार्ग ठप्प

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 7, 2024 05:40 PM2024-07-07T17:40:33+5:302024-07-07T17:41:04+5:30

Sindhudurg Rain News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी झाली. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरले. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Sindhudurg district hit by heavy rains; water entered many houses, damages worth lakhs, highway blocked | सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका ;अनेक घरात घुसले पाणी,लाखोंचे नुकसान, महामार्ग ठप्प

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका ;अनेक घरात घुसले पाणी,लाखोंचे नुकसान, महामार्ग ठप्प

सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी झाली. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरले. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पावसामुळे  ओरोस येथील जिजामाता चौक येथे मुंबई- गोवा महामार्गावर दुपारी पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्गावर अंदाजे २ ते ३ फुटापर्यंत पाणी आले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले आहे.

   तर सावंतवाडी व  बांदा बाजारपेठेतील रस्ते जलमय झाल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती.जिल्ह्यातील इतर तालुक्यातही जोरदार पाऊस पडत आहे.त्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

Web Title: Sindhudurg district hit by heavy rains; water entered many houses, damages worth lakhs, highway blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.