सिंधुदुर्ग जिल्हा दूध संघाच्या दूध संकलनास प्रारंभ
By admin | Published: April 11, 2017 04:46 PM2017-04-11T16:46:18+5:302017-04-11T16:46:18+5:30
नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
आॅनलाईन लोकमत
कुडाळ, दि. ११ : सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, मर्यादित कुडाळ येथील दूध संकलनाचा माजी मुख्यमंत्री, आमदार नारायण राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी सिंधु समृध्दी या त्रैमासिकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निलम राणे, चव्हाण ग्रुप अॅन्ड कंपनीचे अध्यक्ष सतिश सावंत, कार्यकारी संचालिका अश्विनी सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, एम. के. गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संचालक प्रमोद धुरी, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओवणेकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, आर. टी. मर्गज, बांधकाम खात्याचे सभापती संतोष साटविलकर, महिला बालकल्याण खात्याच्या सभापती सायली सावंत, दीप्ती पडते, सावी लोके, आनंद शिरवलकर, गटनेते बिटू तेली, राकेश कांदे, मेघा गांगण, संग्राम प्रभुगावकर, प्रसाद देवधर, अस्मिता बांदेकर, नगराध्यक्ष विनायक राणे, सहाय्यक उर्मिला यादव आदी उपस्थित होते.