सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे शौर्य अभिमानास्पद : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:44 PM2019-08-22T12:44:15+5:302019-08-22T12:49:27+5:30

जीवाची बाजी लावून पुरग्रस्तांना मदत करणारे पोलीस आणि गुन्हेगारांचा शोध लावणा-या सिंधुदुर्ग पोलीसांचे शौर्य अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आज पूर परिस्थितीवेळी विशेष सेवा बजावणाऱ्या पोलीसांना गौरविण्यात आले. तसेच गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते.

Sindhudurg District Police Force bravery proud: Deepak Kesarkar | सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे शौर्य अभिमानास्पद : दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे शौर्य अभिमानास्पद : दीपक केसरकर

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे शौर्य अभिमानास्पद : दीपक केसरकर पूर परिस्थितीवेळी विशेष सेवा बजावणाऱ्या पोलीसांचा गौरव

सिंधुदुर्ग : जीवाची बाजी लावून पुरग्रस्तांना मदत करणारे पोलीस आणि गुन्हेगारांचा शोध लावणा-या सिंधुदुर्ग पोलीसांचे शौर्य अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पूर परिस्थितीवेळी विशेष सेवा बजावणाऱ्या पोलीसांना गौरविण्यात आले. तसेच गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी पालकमंत्री केसरकर बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस कार्यक्षम राहण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये वसतिगृहाच्या धर्तीवर राहण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगून पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, अतिवृष्टीच्या काळात पोलीसांनी जीवाची बाजी लावत अनेक लोकांना पुरातून बाहेर काढत जीवदान दिले. गुन्हे तपासातही चांगले काम करत जिल्ह्याला राज्यात दुस-या क्रमांकाचे स्थान मिळवून दिले.
सीसीटीव्ही यंत्रणा बसवून आधुनिकीकरण स्वीकारणारा जिल्हा ठरला आहे. जिल्हा पोलीसांची ही कामगिरी अभिमानास्पद अशीच आहे. त्यांना लवकरच चांगल्या सुविधा पुरविण्यात आम्ही कटीबध्द आहोत. आपत्कालीन परीस्थितीचा सामना करण्यासाठी बोटी दिल्या जाणार आहेत. पोलीस दुरक्षेत्र ठिकठिकाणी उभारले जाणार आहे. पोलीस ठाणी आधुनिकीकरण व निवासस्थानाच्या दुरुस्तीही केल्या जाणार असल्याचे पालकमंत्री  केसरकर यांनी सांगितले.

पुरग्रस्तांना बाहेर काढत जीवदान देणा-या व मदत करणा-या जिल्ह्यातील 65 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा यावेळी पालकमंत्री  केसरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस दलाने पुरग्रस्तांसाठी जमा केलेल्या 13 लक्ष 11 हजार रुपये एवढ्या मदत निधीचा धनादेशही पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच गुन्हे तपासामध्ये हस्तगत करण्यात आलेला 30 लाख रुपयांचा मुद्देमाल ही संबंधित नागरिकांना सुपुर्द करण्यात आला. या पूर्वी जिल्हा पोलीस परेड मैदानावर तयार करण्यात आलेल्या किल्लाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते पार पाडले.


 

Web Title: Sindhudurg District Police Force bravery proud: Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.