सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांनी गजबजला, हजारोंच्या संख्येने दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:02 PM2018-11-16T12:02:27+5:302018-11-16T12:04:15+5:30

सिंधुदुर्ग : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण तसेच जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने ...

Sindhudurg district tourists gambling, thousands of people in the numbers | सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांनी गजबजला, हजारोंच्या संख्येने दाखल

पर्यटकांसाठी हॉटस्पॉट ठरणाऱ्या तारकर्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना आढळत आहे.

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांनी गजबजला, हजारोंच्या संख्येने दाखलपालक, मुलांसह पर्यटनाचा घेताहेत आनंद

सिंधुदुर्ग : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण तसेच जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी यावेळी खास कोकणची निवड केल्याचे पहायला मिळत होते. दिवाळी निमित्त शासकीय कार्यालयांना असलेली सुट्टी जरी संपली असली तरी शाळा, महाविद्यालयांना अजूनही सुट्टी असल्याने अनेक पालक आपल्या मुलांसह सिंधुदुर्गातपर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

कोकणचं सौंदर्य प्रत्येकाला नेहमीच खुणावत असते. निळाशार समुद्र किनारा आणि इथले निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करते . त्यामुळेच यावर्षी दिवाळीची सुट्टी कोकणातच घालवावी याच बेताने आलेल्या पर्यटकांनी सिंधुदुर्ग जिल्हा हाऊसफुल्ल झाला होता.

अनेक रिसॉर्ट आणि हॉटेल्स फुल झाली होती. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई आणि पुण्यातून कोकणात पर्यटक दाखल झाले होते. परदेशी पाहुण्यांनीही समुद्र किनाऱ्यांनाच जास्त पसंती दिली होती. त्यामुळेच समुद्र किनाºयांवर पर्यटकांची रेलचेल वाढलेली दिसून आली.

समुद्रकिनारपट्टीबाबत अधिक आकर्षण

कोकणाला ७२0 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२0 किलोमीटरचा. त्यातच सिंधुदुर्गातील निसर्गरम्य हिरवाई पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. यावर्षी जिल्ह्यातील कुणकेश्वर, विजयदुर्ग, निवती ,तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला अशा ठिकाणांना पर्यटकांनी जास्त पसंती दिली होती.

अनेक समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जा सुद्धा अनेक पर्यटक घेताना दिसत होते. बच्चे कंपनी बरोबरच त्यांचे पालकही समुद्र किनाºयावर पाण्यात मस्त बागडताना दिसत होते.

परदेशी पर्यटकही दाखल

सिंधुदुर्ग मार्गे गोव्यात जाणारे पर्यटक कणकवली तसेच महामार्गावरील इतर शहरात थांबून जेवणाचा आस्वाद घेताना दिसत होते. अजूनही थोड्या बहुत फरकाने तसेच दृष्य काही हॉटेल मध्ये दिसत आहे.पावसाळा संपल्यानंतर दिवाळीत पर्यटकांची पर्यटनवारी सुरू होते. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आणि परदेशी पर्यटकदेखील सिंधुदुर्गात येतात.

थर्टीफस्टला गर्दीत वाढ होईल

यावर्षी पाऊस जास्त नव्हता तरी देखील पाहूण्यांनी पर्यटनवारी केली नव्हती. मात्र दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने पर्यटकांनी पर्यटन वारीला सुरूवात केलेली आहे. दिवाळीत सुरू झालेले पर्यटक डिसेंबर थर्टी फस्टपर्यंत बहुसंख्येने ये-जा करत असतात. तेव्हा कुठे हॉटेल व्यावसायिकांची गडबड सुरू होते.

गेल्यावर्षी पर्यटकांनी पाठ फिरवली होती. किरकोळ प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावून सिंधुदुर्गात इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत केले होते. गेल्या थर्टीफस्टला गर्दी कमी असल्याने यावर्षी गर्दीत वाढ होईल की, हॉटेल व्यावसायिकासाठी हा हंगाम कोरडा जाईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आताची गर्दी पाहता थर्टीफस्टला गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Sindhudurg district tourists gambling, thousands of people in the numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.