सिंधुदुर्ग : शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 02:20 PM2018-10-11T14:20:33+5:302018-10-11T14:22:57+5:30

शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल.त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले.

Sindhudurg: Education will become our country's super power: Narayan Rane | सिंधुदुर्ग : शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल : नारायण राणे

कणकवली येथील भूमिपूजन कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यानी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.(संजय राणे)

Next
ठळक मुद्देशिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल : नारायण राणेकणकवलीत स्कुलचे भूमिपूजन कार्यक्रमात प्रतिपादन

कणकवली : इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाणारी भाषा आहे. तरुणांना भविष्यात नोकरीसाठी मुलाखत देताना इंग्रजी वक्तृत्व आवश्यक असणार आहे. त्यामुळे ही भाषा अवगत असणे आवश्यक असून प्रगत शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षणानेच आपला देश महासत्ता होईल, त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे व्यक्त केले. कणकवली वरचीवाडी येथे पोदार इंटरनॅशनल स्कुलचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार नीतेश राणे, स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ , नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड़ आदी उपस्थित होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल ही राज्यात नव्हे तर देशातही नावाजलेली संस्था आहे. कणकवलीत त्यांची शाळा सुरू होणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने उल्लेखनीय बाब आहे. आजचे भूमिपूजन म्हणजे भविष्यातील भावी पिढीच्या उद्धाराची नांदी आहे. या शाळेतून शिकलेले विद्यार्थी भविष्यात इंजिनिअर, वैज्ञानिक, वैमानिक, डॉक्टर होतील आणि जिल्ह्याचे नाव उज्वल करतील .

येथील जमिनमालकांनी शाळेच्या माध्यमातून विकासासाठी आपली जमीन दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. या शाळेत स्थानिकाना नोकऱ्या द्या.अशी काहीजण मागणी करतात. पण शाळेचा दर्जा टिकावा यासाठी स्थानिकांपैकी उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तिनाच शिक्षक म्हणून नोकरी द्या .असेही नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

नीतेश राणे म्हणाले, कोणासाठी स्पर्धा करण्यासाठी हा शाळेचा उपक्रम हाती घेतलेला नाही. सिंधुदूर्गातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्टया दिवसेंदिवस प्रगत होत असताना त्याना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

अनेक व्यक्तींकडून आमची प्रतिमा मलिन केली जाते. मात्र, ज्यावेळी प्रत्यक्षात बाहेरुन आलेले लोक आमची भेट घेतात. तेव्हा त्याना आमच्या बद्दल वेगळाच अनुभव येतो. तसे ते बोलून दाखवतात. निवडणुकीत फक्त आश्वासने नकोत तर ती पूर्ण केली पाहिजेत .असे आमचे मत असून त्यामुळेच आम्ही वचनपुर्ती करीत आहोत. असेही नीतेश राणे यावेळी म्हणाले.

 टिकेचे काम देवून ठेवले आहे!

 या शाळेच्या कामाचे भूमिपूजन करी पर्यन्त अनेक अडथळे आले आहेत. त्यामुळे कणकवलीत प्रकल्प आणणे कठीण आहे. कारण जे करु ते आम्हीच करु . दुसऱ्याना ते करु देणार नाही. अशी मानसिकता असलेले काही लोक येथे आहेत.

या शाळेचे उदघाट्न जो पर्यन्त होत नाही तोपर्यन्त अनेक अफवा पसरविल्या जाणार आहेत . हे आम्हाला माहीत आहे. आमच्यावर टिका करण्याचे काम एका कुटुंबियाना पुढील पाच वर्षासाठी देऊन ठेवलेले आहे. ते काम करतील असा टोलाही कोणाचेही नाव न घेता आमदार नीतेश राणे यानी यावेळी लगावला.

 

Web Title: Sindhudurg: Education will become our country's super power: Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.