सिंधुदुर्ग : महोत्सवातून महिलांसाठी रोजगाराचे दालन : विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:42 PM2018-10-31T12:42:52+5:302018-10-31T12:44:14+5:30
सिंधुदुर्ग : गेली काही वर्षे युवा सेना रोजगाराभिमुख स्तुत्य उपक्रम राबवित आहे. दीपावली महोत्सवाचा उपक्रमही महिलांसाठी रोजगाराचे दालन आहे, ...
सिंधुदुर्ग : गेली काही वर्षे युवा सेना रोजगाराभिमुख स्तुत्य उपक्रम राबवित आहे. दीपावली महोत्सवाचा उपक्रमही महिलांसाठी रोजगाराचे दालन आहे, असे प्रतिपादन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी दीपावली महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला आघाडी कुडाळ व शिवसेना नगरसेवक कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्षमीकरण व महिलांना शाश्वत रोजगार देण्यासाठी दीपावली महोत्सवाचे आयोजन कुडाळ शिवसेना शाखा येथे केले असून, ५ नोव्हेंबरपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिद्धेश कदम, दत्ता दळवी, राम रावराणे, नागेंद्र्र परब, संजय पडते, जान्हवी सावंत, राजन जाधव, अभय शिरसाट, सचिन काळप, गणेश भोगटे, श्रेया गवंडे, अमरसेन सावंत, योगेश दळवी, विक्रांत सावंत, योगेश धुरी, पंकज शिरसाट, सागर नाणोस्कर, प्रज्ञा राणे, रोहिणी पाटील, शीतल देशमुख, दीपश्री नेरुरकर, भारती मठकर, हर्षद गावडे, राजू राठोड, शिल्फा घुर्ये, छोटू पारकर, हरी खोबरेकर, संजय भोगटे, सुप्रिया मांजरेकर, संजय गवस आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी हा उपक्रम दरवर्षी मोठ्या स्वरुपात राबविण्यासाठी आमचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. या महोत्सवात महिला बचतगटांचे विविध स्टॉल असून, त्यामध्ये घरगुती फराळ, आकर्षक आकाशकंदील, पणत्या, दिवे, गावठी पोहे, रताळी, उटणे तसेच दिवाळीसाठी लागणारी कारटे व करंजीपर्यंतचे सर्व पदार्थ व वस्तू उपलब्ध आहेत. महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे.
युवा सेनेच्या उपक्रमांना सहकार्य : राऊत
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी, युवासेनेने युवक व महिलांना रोजगार देण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले उपक्रम राबविले आहेत. दीपावली महोत्सवाच्या ठिकाणी स्टॉल लावून महिलावर्गाला एक रोजगाराचे दालन दिले आहे. भविष्यात त्यांनी असेच चांगले उपक्रम हाती घ्यावेत. आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगत युवासेनेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.