सिंधुदुर्ग : बांद्यात जुनाट पिंपळाला आग, मयेकर कुटुंबीय बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 06:23 PM2018-02-28T18:23:24+5:302018-02-28T18:23:24+5:30
बांदा-देऊळवाडी येथील जुनाट पिंपळ वृक्षाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने वृक्ष जळाला. जळालेल्या स्थितीतील वृक्ष लगतच्या सदाशिव मयेकर यांच्या घरावर तसेच वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांवर कोसळला. सुदैवाने मयेकर कुटुंबीय बालंबाल बचावले. यात वीज वितरण कंपनीचे दोन विद्युत पोल मोडून पडल्याने सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
बांदा : बांदा-देऊळवाडी येथील जुनाट पिंपळ वृक्षाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने वृक्ष जळाला. जळालेल्या स्थितीतील वृक्ष लगतच्या सदाशिव मयेकर यांच्या घरावर तसेच वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांवर कोसळला.
सुदैवाने मयेकर कुटुंबीय बालंबाल बचावले. यात वीज वितरण कंपनीचे दोन विद्युत पोल मोडून पडल्याने सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेमुळे देऊळवाडी परिसरातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होते. पिंपळवृक्षाला लागलेल्या आगीत वृक्ष नजीक असलेल्या मयेकर यांच्या घरावर कोसळला.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वीज वितरणचे दोन पोल कोसळल्याने सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले.