सिंधुदुर्ग सलग बाराव्या वर्षी राज्यात प्रथम; जिल्ह्याचा निकाल ९९.४२ टक्के, मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 03:18 PM2022-06-17T15:18:44+5:302022-06-17T15:20:01+5:30
सावंतवाडी तालुक्याचा निकाल सर्वाधिक
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (इ.१० वी) परीक्षेच्या निकालात पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात एकूण १० हजार १२१ विद्यार्थ्यीनी नोंदणी केली होती. १० हजार १११ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातील १० हजार ५३ विध्यार्थी उत्तीर्ण होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९९.४२ टक्के लागला. हा निकाल राज्यात सर्वाधिक आहे.
यातील ५ हजार २९७ विद्यार्थंना प्रथम श्रेणी विशेष प्राविण्य, ३५५६ प्रथम श्रेणीत, १०८१ द्वितीय श्रेणीत तर ११९ विद्यर्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. यंदा सुद्धा निकालात मुलींनीच बाजी मारली आहेत. परीक्षेला बसलेल्या एकूण १० हजार १११ विद्यार्थ्यात ५ हजार २२३ मुलगे तर ४८८८ मुली होत्या. यापैकी ५१८९ मुलगे आणि ४८६४ मुली उत्तीर्ण झाल्या. यात मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९९.३४ तर मुळींच उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९९.५० टक्के आहे. कोकण विभागातून एकूण ३० हजार ८८३ विद्यार्थ्यीनी नोंदणी केली होती. ३० हाहजार ८१६ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातील ३० हजार ५९३ विध्यार्थी उत्तीर्ण होऊन कोकण विभागाचा निकाल ९९.२७ टक्के लागला.
तालुकावार निकाल पुढील प्रमाणे
देवगड – ९८.८९
दोडामार्ग – ९९.७६
कणकवली – ९९. १९
कुडाळ – ९९.५८
मालवण – ९९.२०
सावंतवाडी – ९९.९४
वैभववाडी – ९९.४२
वेंगुर्ला – ९९.५०