राणे कुटुंबियांचा गृहपाठ घेणारा अजून जन्माला यायचाय, संजना सावंतांची सुषमा अंधारेंवर टीका

By सुधीर राणे | Published: November 29, 2022 04:16 PM2022-11-29T16:16:57+5:302022-11-29T16:19:20+5:30

आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला टोला

Sindhudurg former Zilla Parishad president Sanjana Sawant Shiv Sena deputy leader Criticism on Sushma Andhare | राणे कुटुंबियांचा गृहपाठ घेणारा अजून जन्माला यायचाय, संजना सावंतांची सुषमा अंधारेंवर टीका

राणे कुटुंबियांचा गृहपाठ घेणारा अजून जन्माला यायचाय, संजना सावंतांची सुषमा अंधारेंवर टीका

googlenewsNext

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आपल्या मुंबईतील भाच्याला अगोदर सुधारण्याचे सल्ले द्यावेत. कोकणात येऊन गेल्यानंतर अंधारे यांनी मी राणेंचा गृहपाठ घेतला अशी बेताल वक्तव्ये केली आहेत. मात्र, नारायण राणे यांचा गृहपाठ घेणारा अजून जन्माला यायचाय असा टोला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांना लगावला.

नितेश व निलेश राणे यांना सुषमा अंधारे यांनी संस्कृती शिकवण्याएवढी अजून वेळ आलेली नाही. त्यांना जर संस्कृती शिकवायचीच असेल तर त्यांच्या मुंबईतील भाच्याला ती शिकवावी असा टोलाही आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ठाकरे गटाच्या महिला नेत्यांकडून जी बेताल व असभ्य वक्तव्ये केली जात आहेत. त्याकरिता त्यांचा पहिला त्यांच्या पक्षाने 'क्लास' घ्यावा.  त्यानंतर त्यांच्या स्वयंघोषित नेत्यांनी इतरांना धडे द्यावेत. सुषमा अंधारे यांना जर वाटत असेल की मुंबईत गेल्यानंतर राणेंवर काही बोलले तरी चालेल. मात्र, असे असेल तर त्यांनी आमचे आव्हान स्वीकारावे. हवे तर आम्ही मुंबईत येऊन सुषमा अंधारेना आव्हान द्यायला तयार आहोत. सिंधुदुर्गात येवून आमच्या नेत्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले तर खपवून घेतले जाणार नाही. असा इशारा सावंत यांनी दिला.

Web Title: Sindhudurg former Zilla Parishad president Sanjana Sawant Shiv Sena deputy leader Criticism on Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.