सिंधुदुर्ग : राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:34 PM2018-12-04T17:34:33+5:302018-12-04T17:35:42+5:30

कणकवली : मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही ...

Sindhudurg: Give power to Raj Thackeray: Parshuram Upkar | सिंधुदुर्ग : राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर

सिंधुदुर्ग : राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर

Next
ठळक मुद्देराज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर महाराष्ट्राची अस्मिता ते जपतील; उपरकर यांचे प्रतिपादन





कणकवली : मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना घेतलेली भूमिका अजूनही सोडलेली नाही. फक्त मतांसाठी ते कधीही काम करीत नाहीत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने ते करीत असून उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जावून त्याना त्यांनी ठणकावले आहे. त्यामुळे मराठी जनतेने राज ठाकरे यांच्या हाती एकदा सत्ता द्यावी त्यांचे सर्वार्थाने भले केल्याशिवाय ते रहाणार नाहीत. असे प्रतिपादन मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केले.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली शहराध्यक्ष शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.

परशुराम उपरकर पुढे म्हणाले, उत्तर भारतीयांचे निमंत्रण स्विकारुन त्यांच्या व्यासपीठावर गेलेल्या राज ठाकरे यांनी मराठी माणसाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हिरावुन घेण्याचा प्रकार तसेच त्यांच्या अधिकारावर परप्रांतियानी गदा आणणे याविषयी कायद्याचा आधार घेऊन वक्तव्य केले. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा आधारहि त्यांनी यावेळी घेतला. तसेच महाराष्ट्राची बाजू समर्थपणे मांडली.

उत्तर भारतीयांसमोर मनसेच्या 'खळखट्याक' बाबत असलेले गैरसमज स्पष्ट केले. इतर नेते उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जावून त्यांची स्तुती करीत असतात.
तसेच त्याना संरक्षण देत असतात. मात्र, राज ठाकरे यांनी परिणामांची तमा न बाळगता आपले विचार स्पष्टपणे मांडले. या राज्यात जो कामानिमित्त येईल त्यांनी येथील भाषा शिकलीच पाहिजे.तसेच महाराष्ट्रातील युवक बाहेरच्या राज्यात जातील तर त्यांनी तेथील भाषा शिकुन समरस व्हावे.असेही सांगितले.

महाराष्ट्रात बाहेरील राज्यातून येणारा लोंढा आता थांबवा. माझी भूमिका ही कधीही बदलणार नाही. येथील आया -बहिणींची छेड काढाल तर सोडणार नाही असे ठणकावले आहे. उत्तर भारतीयाना समजावे तसेच आपले विचार त्यांच्या पर्यन्त पोहचावे यासाठी त्यांनी मागणी नुसार हिंदीतून भाषण केले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

रेल्वे भरती स्थानिक पातळीवर व्हावी यासाठी मनसेने तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांना पत्र लिहिले होते. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. मात्र , ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेऊन त्यांनी तसे आदेश काढल्याची आठवण राज ठाकरे यानी यावेळी करून दिली. त्याचप्रमाणे असे अनेक प्रश्न मनसेने मार्गी लावल्याने जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे. मनसेने पक्ष स्थापने पासून आपले मुद्दे सोडलेले नाही. त्या मुद्याशी एकनिष्ठ राहिली आहे. त्यामुळे मनसेनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत जनतेने मनसेला संधी द्यावी. असे आवहनही परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.

Web Title: Sindhudurg: Give power to Raj Thackeray: Parshuram Upkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.