सिंधुदुर्ग : गोव्याच्या पर्यटकांना सावंतवाडीत चोपले, पोलिसांची मध्यस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:12 PM2018-07-09T15:12:57+5:302018-07-09T15:16:38+5:30
आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या गोव्यातील पर्यटकांनी सावंतवाडीतील युवकांच्या गाडीला हूल देत शिवीगाळ केल्याने संतापलेल्या युवकांनी गोव्यातील पर्यटकांची यथेच्छ धुलाई केली. हा प्रकार आंबोली तसेच सावंतवाडी येथेही घडला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला आहे.
सावंतवाडी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या गोव्यातील पर्यटकांनी सावंतवाडीतील युवकांच्या गाडीला हूल देत शिवीगाळ केल्याने संतापलेल्या युवकांनी गोव्यातील पर्यटकांची यथेच्छ धुलाई केली. हा प्रकार आंबोली तसेच सावंतवाडी येथेही घडला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला आहे.
वर्षा पर्यटनासाठी गोव्यातील काही पर्यटक शनिवारी आंबोलीत गेले होते. त्याचवेळी सावंतवाडीतील काही युवक कारने आंबोलीत गेले होते. आंबोलीतून सावंतवाडीतील पर्यटक पुन्हा घरी येत असताना घाटातच सावंतवाडीतील युवकांच्या गाडीला गोव्यातील पर्यटकांनी हूल दिली.
सावंतवाडीतील युवकांना शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या युवकांनी तुम्ही शिवीगाळ कोणाला करता? असे विचारले. त्यावेळी सावंतवाडीतील युवकांना त्यांनी आणखी दादागिरी केली. त्यामुळे संतापलेल्या सावंतवाडीतील युवकांनी गोव्यातील पर्यटकांची चांगलीच धुलाई केली. आंबोलीत व सावंतवाडीत त्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला.