सिंधुदुर्ग : सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येस उद्युक्त करते : रघुनाथ दादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:20 PM2018-03-27T16:20:24+5:302018-03-27T16:20:24+5:30
शेतकरी नांगरणीपासून मशागतीपर्यंत अनेक कामांसाठी सरकारला टॅक्स भरत असतो पण सरकार शेतकऱ्यांला हमीभावही देत नाही व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अधोगतीला आणले आहे. पयार्याने शेतकऱ्यांला हे सरकार आत्महत्या करण्यास उद्युक्तच करत आहे असा घणाघाती आरोप शेतकरी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सिंधुदुर्गात केला.
सिंधुदुर्गनगरी : शेतकरी नांगरणीपासून मशागतीपर्यंत अनेक कामांसाठी सरकारला टॅक्स भरत असतो पण सरकार शेतकऱ्यांला हमीभावही देत नाही व निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अधोगतीला आणले आहे. पयार्याने शेतकऱ्यांला हे सरकार आत्महत्या करण्यास उद्युक्तच करत आहे असा घणाघाती आरोप शेतकरी सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सिंधुदुर्गात केला.
शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रातीसिंह मासाहेब पाटील यांच्या गावातून सुरू केलेली ही जागर यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जागर सभा झाली. यानंतर पत्रकांशी ते बोलत होते. यावेळी सत्यशोधक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक जगताप, राज्य संघटक किशोर ढमाले, आम आदमी पक्षाचे विवेक राणे, आनंद डिचोलकर , नैना कुºहाडे, दीपक सावंत आदी उपस्थित होते.
रघूनाथदादा पाटील यांनी या जागर यात्रेची माहिती देताना सांगितले की १९ मार्चपासून ही यात्रा सुरू झाली आहे. या सरकारकडुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी व शेतमालाला हमीभाव मिळावा अशा शेतकरी हिताच्या मागण्या होत्या. मात्र अगोदरच्या सरकारने काय किंवा या सरकारने काय शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा आहे.
भारताचे धोरण आज शेतमाल निर्यात बंदीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घेऊनही आपल्या मालाला दर घेता येत नाही. भारतात आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतमाल निर्माण होतो मात्र त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. उलट शेतकरी मात्र डिझेल म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा सर्वाधिक थेट कर सरकारला भरत असतो.
३० एप्रिल रोजी जेलभरो
रघुनाथदादा म्हणाले, कर्जमाफी जाहीर केली गेली मात्र त्यातही एवढा घोळ घातला गेला की शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली. त्याचेच पर्यावसान अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये होत आहे.
यासाठी सरसकट कर्जमाफी ही आमची आग्रही मागणी आहे. या जगात यात्रेच्या शेवटी ३० एप्रिलला शासनाच्या शेतकरी धोरण विरोधात सविनय कायदेभंग म्हणून जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील तुरूंग अपुरे पडतील.