सिंधुदुर्ग : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे फलक स्वाभिमानने फाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:19 IST2019-01-08T16:17:29+5:302019-01-08T16:19:19+5:30
विनाशकारी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे ओरोस रेल्वे स्थानक परिसरात लागलेले फलक युवा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फाडले.

सिंधुदुर्ग : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे फलक स्वाभिमानने फाडले
सिंधुदुर्ग : विनाशकारी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे ओरोस रेल्वे स्थानक परिसरात लागलेले फलक युवा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फाडले.
ओरोस स्थानक परिसरात ग्रीन रिफायनरीचे फलक लागल्याची माहिती मिळताच युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी ओरोस स्थानकात परिसरात रिफायनरीचे लागलेले फलक फाडले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, विधानसभा अध्यक्ष अमित साटम, तालुकाध्यक्ष विनायक ठाकूर, दादा साईल, हुसेन लांजेकर, सचिन पारधीये, अक्रम खान, नितीन पाडावे, मुन्ना दळवी, गणेश तळगावकर, प्रथमेश परब, विजय इंगळे, मकरंद सावंत, स्वप्नील गावडे, सुमित सावंत, प्रथमेश दळवी, राजवीर गांगर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.