सिंधुदुर्ग : इन्सुली येथे २१ लाखांचा गुटखा जप्त, अन्नभेसळ विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 05:04 PM2018-03-27T17:04:40+5:302018-03-27T17:04:40+5:30
राज्यात गुटखा बंदीचा आदेश असतानाही सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-डोबवाडी येथे छुप्या पध्दतीने बेकायदा गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस व बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांच्या पोलीस पथकाने छापा टाकून २१ लाख ३४ हजार ८०० रुपये किमतीचा बेकायदा गुटखा जप्त केला.
बांदा : राज्यात गुटखा बंदीचा आदेश असतानाही सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-डोबवाडी येथे छुप्या पध्दतीने बेकायदा गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस व बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांच्या पोलीस पथकाने छापा टाकून २१ लाख ३४ हजार ८०० रुपये किमतीचा बेकायदा गुटखा जप्त केला.
या प्रकरणी गोडाऊनच्या जागेचे मालक कानजी उर्फ पप्या साबाजी राणे (३०, रा. इन्सुली-डोबवाडी) व गोडाऊनची जागा भाडेकरारावर दिलेल्या भूषण उर्फ आबा श्रीकृष्ण शिरसाट (५0, रा. बांदा-बाजारपेठ) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई सोमवारी दुुपारी करण्यात आली.
अन्नभेसळ विभागाचे अधिकारी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दयानंद गवस यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, हवालदार लक्ष्मण पडकील, सागर भोसले, विनायक पास्ते, अमित सावंत, प्रितम कदम, सचिन कोयंडे, रामचंद्र चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बेकायदा गुुटखा साठ्याचे केंद्र पोलिसांनी छापा टाकून पकडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यात देखील छुप्या पध्दतीने गुटख्याची विक्री होत असल्याचे आता उघड झाले आहे. बेकायदा गुटखा विक्रीची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे दयानंद गवस यांनी सांगितले.