सिंधुदुर्ग  : शाळा दुरुस्तीला सर्वात जास्त निधी : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:11 PM2018-12-06T14:11:15+5:302018-12-06T14:12:27+5:30

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी हुशार आहेत. त्यांच्या शैक्षणिक ज्ञानात वाढ व्हावी म्हणून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न ...

Sindhudurg: The highest funding for the school repairs: Deepak Kesarkar | सिंधुदुर्ग  : शाळा दुरुस्तीला सर्वात जास्त निधी : दीपक केसरकर

सिंधुदुर्ग  : शाळा दुरुस्तीला सर्वात जास्त निधी : दीपक केसरकर

Next
ठळक मुद्देशाळा दुरुस्तीला सर्वात जास्त निधी : दीपक केसरकरसावंतवाडीत शाळा नं. ४ चे भूमिपूजन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी हुशार आहेत. त्यांच्या शैक्षणिक ज्ञानात वाढ व्हावी म्हणून पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. शाळा दुरुस्तीसाठी कधी नाही एवढा निधी दिला आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या झाराप येथील उपकेंद्रात कौशल्य विकासावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ४ च्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, सभापती पंकज पेडणेकर, माजी सभापती रवींद्र्र मडगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, विक्रांत सावंत, रुपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, नगरसेवक दीपाली सावंत, उदय नाईक, समृद्धी विर्नोडकर, अ‍ॅड. पी. डी. देसाई, उमाकांत वारंग, अशोक दळवी, म. ल. देसाई, आनंद तळवणेकर, सुधन्वा आरेकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना गोडसे, गटविकास अधिकारी गजानन भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, जिल्ह्यातील विद्यार्थी हुशार आहेत. त्यामुळे शैक्षणिक दर्जात वाढ व्हावी म्हणून आपण यशस्वी प्रयत्न करीत आहोत. शैक्षणिक दर्जा वाढवितानाच शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांनादेखील निधी दिला आहे.

चराठे येथील ओजस आंतरराष्ट्रीय शाळेला एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या झाराप उपकेंद्र्रस्थळी कौशल्य विकास शैक्षणिक उपक्रम हाती घेतला जाणार आहे, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

सावंतवाडी नगरपरिषदेचे स्पर्धा परीक्षा केंद्र्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या केंद्र्रातून अधिकारी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या अद्ययावत केंद्र्रातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना व्हावे म्हणून सुमारे एक लाख घरात इंटरनेटची कनेक्शने दिली जाणार आहेत. त्यातून शैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कौशल्य विकास शिक्षणासाठी सावंतवाडीत शंभर कोटींच्या गुंतवणुकीचे आयटी सेंटरदेखील उभारले जात आहे. शैक्षणिक प्रगती व्हावी आणि महिलांना रोजगार मिळावा म्हणून आपण उपक्रम हाती घेतल्याचे केसरकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, सभापती पंकज पेडणेकर, माजी सभापती रवींद्र्र मडगावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी रेश्मा सावंत यांनी या शाळेच्या निधीसाठी आपण पालकमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली, असे सांगितले.

सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लागेल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. आपणास जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी याबाबत सांगितले आहे. त्यांच्यासह आपण जागेची पाहणी करू, असेही ते म्हणाले.

Web Title: Sindhudurg: The highest funding for the school repairs: Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.