सिंधुदुर्ग : तायक्वांदो स्पर्धेत कणकवली तालुक्याला जनरल चँपियनशिपचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:34 PM2018-12-24T12:34:00+5:302018-12-24T12:36:29+5:30

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशन व अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या सहकार्याने येथील नगरपंचायत सभागृहात जिल्हास्तरीय सब जुनियर कॅडेट व जुनियर तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Sindhudurg: Honor of General Champion in Kankavali Taluka in Taekwondo Games | सिंधुदुर्ग : तायक्वांदो स्पर्धेत कणकवली तालुक्याला जनरल चँपियनशिपचा बहुमान

कणकवली येथील जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत जनरल चॅम्पीयनशीपचा चषक देऊन राजश्री धुमाळे यांनी खेळाडूंना गौरविले. यावेळी भालचंद्र कुलकर्णी , अँड. संदिप राणे , संदिप सावंत , एकनाथ धनवटे आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे कणकवली तालुक्याला जनरल चँपियनशिपचा बहुमानतायक्वांदो स्पर्धेत चॅम्पियनशिप

कणकवली : तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशन व अतुल रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या सहकार्याने येथील नगरपंचायत सभागृहात जिल्हास्तरीय सब जुनियर कॅडेट व जुनियर तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कणकवली तालुक्याने 48 सुवर्ण पदक ,33 रौप्यपदक व 25 कांस्य पदकाची कमाई करून या स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व राखत जनरल चॅम्पियनशिप मिळविली .

या स्पर्धेत जिल्हयातील 200 खेळाडू सहभागी झाले होते .यात कुडाळ तालुक्याने 5 सुवर्ण पदक , 5 रौप्यपदक व 7 कांस्य पदक मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला तर सावंतवाडी तालुक्याने 3 सुवर्ण पदक 5 रौप्यपदक व 5 कांस्य पदकांची कमाई करून तिसरे स्थान मिळविले . या स्पर्धेत बेस्ट फायटर म्हणून मुलांमध्ये साईराज सावंत तर मुलींमध्ये सेजल पाटील यांना गौरवण्यात आले . स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कणकवली तालुका अमॅच्युर तायक्वादो असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक बेलवलकर , तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी , विनायक सापळे , अमित जोशी , अच्युत वनवे , कणकवली तालुका तायक्वादो असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे , कोषाध्यक्ष अड. संदिप राणे , जयश्री कसलकर , नितीन तावडे , संदिप सावंत , सावंतवाडी तालुका सचिव अभिजीत राऊळ , कुडाळ तालुका सचिव ओमकार सावंत , राष्ट्रीय पंच मंदार परब , अक्षय कुलकर्णी , अनुप मोडक , जीविता जाधव , संतोष पवार , अवीराज खांडेकर तसेच प्रशिक्षक संदिप मोडक , साई दळवी , सौरभ आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अच्युत वनवे यांनी केले. तर आभार एकनाथ धनवटे यांनी मानले.
 

Web Title: Sindhudurg: Honor of General Champion in Kankavali Taluka in Taekwondo Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.