सिंधुदुर्ग : पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:40 IST2018-09-22T17:38:09+5:302018-09-22T17:40:47+5:30
पूर्व किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम शनिवारी पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले आहेत. यात पाण्याचा प्रवाहात बदल झाल्याने अनेक मच्छिमारांच्या जाळी खडकात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.

पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा परिणाम जाणवत असल्याने मालवण येथील समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
सिंधुदुर्ग : पूर्व किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले आहेत. यात पाण्याचा प्रवाहात बदल झाल्याने अनेक मच्छिमारांच्या जाळी खडकात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ तसेच अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला होता. या वादळसदृश्य स्थितीचा परिणाम सकाळपासूनच पश्चिम किनाऱ्यावर दिसून आला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. समुद्रातील वारे दक्षिणेकडे वळल्याने त्याचा पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.
समुद्र खवळला, खबरदारीचे आवाहन
वादळसदृश्य परिस्थितीमुळे समुद्र खवळला आहे. सकाळच्या सत्रात काही मच्छिमारांनी मासेमारी केली. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका सायंकाळपर्यंत बंदरात परततील असे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले.
वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्री वातावरणात बदल झाला आहे. समुद्र खवळल्याने अकरा दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी भाविकांनी, मच्छिमारांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.