सिंधुदुर्ग : मालवणात मटक्यावर पोलीस अधीक्षकांचे छापे, तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:57 PM2018-02-07T18:57:13+5:302018-02-07T19:00:08+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मालवण शहरात सोमवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापे टाकले. यात पोलिसांनी ३४ हजार रोख राकमेसह दोन मोबाईल जप्त केले असून तीन जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
मालवण : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मालवण शहरात सोमवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापे टाकले. यात पोलिसांनी ३४ हजार रोख राकमेसह दोन मोबाईल जप्त केले असून तीन जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी तातडीने बोलावून घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर अधिक्षकांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात नेमण्यात आलेल्या विशेष पथकाने सोमवारी रात्री मटका अड्ड्यावर उशीरा छापे टाकले.
यात मालवण शहरातील भगवान जनार्दन बांधकर (६५, रेवतळे), शंकर पांडुरंग खडपकर (३५, धुरीवाडा), संजय पांडुरंग मुसळे (५१, मशीद गल्ली मालवण) या तिघांना मुंबई मटका अवैध खेळवल्याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.
गोपनीय सूत्रांकडून माहिती
मालवण शहरात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात मटका, जुगार खेळवला जात असल्याच्या तक्रारी पोलीस अधिक्षकांकडे गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून जात होत्या. त्यामुळे या तक्रारींची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली.