Sindhudurg:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथे ९ जणांना अळंबीतून विषबाधा, तिघेजण अत्यवस्थ 

By अनंत खं.जाधव | Published: July 21, 2024 10:02 PM2024-07-21T22:02:59+5:302024-07-21T22:03:24+5:30

Sindhudurg News: कोलगाव – कुंभारवाडी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने ९ जण अत्यवस्थ झाल्याची खळबजनक घटना घडली असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बाबुळी येथे हलविण्यात आले आहे.हा प्रकार रविवारी दुपारच्या जेवणातून घडला.

Sindhudurg: In Sindhudurg District, Kolgaon, 9 people were poisoned by Alambi, three in critical condition.  | Sindhudurg:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथे ९ जणांना अळंबीतून विषबाधा, तिघेजण अत्यवस्थ 

Sindhudurg:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथे ९ जणांना अळंबीतून विषबाधा, तिघेजण अत्यवस्थ 

सावंतवाडी - कोलगाव – कुंभारवाडी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने ९ जण अत्यवस्थ झाल्याची खळबजनक घटना घडली असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बाबुळी येथे हलविण्यात आले आहे.हा प्रकार रविवारी दुपारच्या जेवणातून घडला.

कोलगाव कुंभारवाडी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने ९ जण अत्यवस्थ झाले यामध्ये चंद्रलेखा चंद्रकांत कुंभार (50) सोनाली चंद्रकांत कुंभार (28) राजन नामदेव कुंभार (48) दीपक नामदेव कुंभार (44) दिव्या दिपक कुभांर (42) दूर्वा दिपक कुंभार (9) निखिल दिपक कुभांर (13) नामदेव राजन कुंभार (10) गुणवंती नामदेव कुभांर (72) अशी त्यांची नावे आहेत. 

यापैकी दीपक कुंभार, दुर्वा कुंभार, राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक असून त्याना गोवा बाबुळी येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. कुंभार कुटुंबीयांनी रविवारी दुपारी अळंबीचे जेवण बनविले होते. त्यांच्याकडे मळेवाड येथील नातेवाईक सोनाली कुंभार व चंद्रलेखा कुंभार या आल्या होत्या. सर्वांनी दुपारी एकत्रित जेवण केले.त्यानंतर काहि वेळातच सर्वानाच उलटी व जुलाब यांचा त्रास सुरू झाला. 

याबाबत ची माहिती शेजारी राहात असलेल्याना देण्यात आली त्यानंतर शेजारी कुंभार याच्या घरी आले त्यानी सगळ्याना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. पैकी दीपक कुंभार, दुर्वा कुंभार व राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना गोवा येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

तर उर्वरित सर्वावर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान सावंतवाडी रूग्णालयात दाखल सर्वाची प्रकृती रात्रीउशिरा पर्यत सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg: In Sindhudurg District, Kolgaon, 9 people were poisoned by Alambi, three in critical condition. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.