सिंधुदुर्ग : विजयदुर्ग महोत्सवाचे उद्घाटन, ढोलताशे, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:29 PM2017-12-30T16:29:57+5:302017-12-30T16:38:11+5:30

विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ तसेच विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आले. विजयदुर्ग महोत्सवाची सुरूवात विजयदुर्ग एसटी डेपो ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने करण्यात आली.

Sindhudurg: Inauguration of Vijaydurg Festival, Dholatash, Fireworks firing procession | सिंधुदुर्ग : विजयदुर्ग महोत्सवाचे उद्घाटन, ढोलताशे, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक

विजयदुर्ग महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

googlenewsNext
ठळक मुद्देविजयदुर्ग किल्ल्याला व विजयदुर्ग बंदर परिसर विद्युत रोषणाई विजयदुर्ग समुद्रावर वाळूमध्ये शिल्प, रांगोळी स्पर्धेचे आयोजन

देवगड : विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ तसेच विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर विजयदुर्ग बंदर अधिकारी गवार, विजयदुर्ग पोलीस अमोल चव्हाण, विजयदुर्ग सरपंच शितल पडेलकर, प्रसाद देवधर, ग्रामसेवक मुल्लांनी, विजयदुर्ग उपसरपंच महेश बीडये, पोलीस पाटील राकेश पाटील, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ अध्यक्ष यश वेलणकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ अध्यक्ष नितीन जावकर, सचिन खडपे, चंदू बीडये, शितल देवरकर, राजू परूळेकर, शैलेष खडपे, वर्षा गोखले, अविनाश गोखले, आनंद गोखले, प्रदिप साखरकर आदी उपस्थित होते.

यावेळी जठार म्हणाले की, प्रमोद जठारांबद्दल लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ग्रीनरिफायनरी प्रकल्पामुळे जर कोकणचा ऱ्हास होणार असेल, येथील पर्यटनाला धोका पोहोचणार असेल, हा प्रकल्प खरच प्रदूषणकारी असेल, हा प्रकल्प ग्रीन नसेल तर माझाही विरोध असेल या बाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. 

या प्रकल्पाविषयी योग्य ती माहिती ग्रामस्थांनी प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. मी कोणी एंजट नाही. हे राज्य रयतेचे आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी सरकारकडून जी काही मदत करता येईल त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरूवात सर्वधर्मिय बांधवांनी प्रार्थना करून करण्यात आली. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष नितीन जावकर यांनी यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांना मंडळाने तयार केलेले विजयदुर्ग पर्यटनाची माहिती देणारे कॅलेंडर दिले.

विजयदुर्ग येथे विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्यापाशी भव्य स्टेज उभारणी करण्यात आली असून तीन दिवस येथे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. या महोत्सवात अनेक कलाकारांनी सुंदर अशा काढलेल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

विजयदुर्ग समुद्रावर वाळूमध्ये शिल्प काढण्यासाठी अनेक स्पर्धकांनी सुरूवात केली असून तीन दिवस येथे ही शिल्प काढली जाणार आहेत. विजयदुर्ग किल्ल्याला व विजयदुर्ग बंदर परिसर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

ढोलताशे, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक

विजयदुर्ग महोत्सवाची सुरूवात विजयदुर्ग एसटी डेपो ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी विजयदुर्ग माध्यमिक शाळा, विजयदुर्ग प्राथमिक शाळा, विजयदुर्ग उर्दु शाळा या शाळेचे विद्यार्थी लेझिम पथकासह या मिरवणुकीत सामील झाले होते.

विजयदुर्ग प्राथमिक शाळेची मुले यावेळी ऐतिहासिक पोषाखात मिरवणुकीत सामिल झाली होती. यावेळी महिलांनी नववारी साड्या नेसून व फेटा बांधून या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविला.

 

Web Title: Sindhudurg: Inauguration of Vijaydurg Festival, Dholatash, Fireworks firing procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.