सिंधुुदुर्ग : ग्राहक संघटनेच्या नावावर नोकरीचे आमिष, अनेकांची फसवणूक; कुडाळातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:41 PM2018-06-19T16:41:22+5:302018-06-19T16:41:22+5:30

ग्राहक संघटनेच्या नावाखाली नोकरी देतो, अशी बतावणी करीत सिंधुदुर्गातील काही नागरिकांकडून लाखो रूपये उकळणाऱ्या संशयित व्यक्तीस फसवणूक झालेल्या नागरिकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात आणले. मात्र याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Sindhudurg: Job lure in the name of a customer organization, many fraud; Types of Kundalas | सिंधुुदुर्ग : ग्राहक संघटनेच्या नावावर नोकरीचे आमिष, अनेकांची फसवणूक; कुडाळातील प्रकार

सिंधुुदुर्ग : ग्राहक संघटनेच्या नावावर नोकरीचे आमिष, अनेकांची फसवणूक; कुडाळातील प्रकार

Next
ठळक मुद्देसंशयित व्यक्तीस नेले पोलीस ठाण्यात अनेकांची फसवणूक; कुडाळातील प्रकार

सिंधुुदुर्ग : ग्राहक संघटनेच्या नावाखाली नोकरी देतो, अशी बतावणी करीत सिंधुदुर्गातील काही नागरिकांकडून लाखो रूपये उकळणाऱ्या संशयित व्यक्तीस फसवणूक झालेल्या नागरिकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात आणले. मात्र याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

यातीलच फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिलेली माहिती अशी, २०१६ साली कुडाळ येथे आलेल्या मुंबईतील काही व्यक्तींनी आपण एका ग्राहक संघटनच्या पदाधिकाऱ्यांचे निकट असून शासनाच्या वतीने येथे आलो असल्याचे सांगितले.

आमच्या ग्राहक संघटनेचा सदस्य झाल्यास सुमारे २७ हजार रूपये प्रतिमहिना पगार सुरू होईल. तसेच इतर कमिशनेही मिळणार, मात्र सदस्य होण्यासाठी सुमारे ३० हजार रूपये शुल्क भरावे लागेल, असे सांगितले होते.

शासकीय सेवा मिळण्याच्या आमिषाला बळी पडून जिल्ह्यातील अनेकांनी ३० हजार रूपये भरून सदस्यत्व घेतले. त्यानंतर मुंबईतील त्या व्य्क्तींनी पैसे भरलेल्यांच्या बैठका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे तुमची नावे पाठविली असून, लवकरच तुम्हाला नियुक्ती पत्रे मिळतील, असे सांगितले.

या बैठकीनंतर अनेक महिने लोटूनही ३० हजार रू पये भरलेल्या एकालाही शासकीय सेवेत रूजू होण्याचे आदेश मिळाले नाहीत किंवा खात्यावर कोणतीही रक्कम झाली नाही. त्यामुळे संबंधित सर्वांनी मुंबईच्या ह्यत्याह्ण प्रमुख व्यक्तीशी फोनवर तसेच सर्व प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोनही लागला नाही आणि भेटही झाली नाही.

या प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सर्वांनी मुख्य सूत्रधाराला पकडून आपले पैसे वसूल करण्याचा चंग बांधला. काही महिन्यात त्या संघटनेच्या दोघांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले. त्यातील एकाने आपण सर्वांची जबाबदारी घेऊन पैसे देतो, असे सांगत दोन चेक दिले. मात्र ते चेकही बाऊन्स झाले आणि ती व्यक्तीही पुन्हा मिळाली नाही.

या दरम्यान या ग्राहक संघटनेची मुंबईतील एक व्यक्ती पुन्हा कुडाळमध्ये येऊन मी तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देतो. माझ्याकडे नवीन स्कीम आहे, असे सांगितले. मात्र तेथे जमलेल्या सर्वांनी त्या व्यक्तीला पकडून कुडाळ पोलिसांत आणले. पोलिसांना या फसवणुकीबाबत माहिती देत जोपर्यंत मुख्य सूत्रधार येत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Sindhudurg: Job lure in the name of a customer organization, many fraud; Types of Kundalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.