सिंधुदुर्ग : आंबोलीत किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:12 PM2018-06-13T17:12:29+5:302018-06-13T17:12:29+5:30
गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. दरम्यान, आंबोली घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी झाडेही कोसळली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
Next
ठळक मुद्देआंबोलीत किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूधबधबा काही अंशी प्रवाहित
सिंधुदुर्ग : गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील धबधबा काही अंशी प्रवाहित झाला आहे. दरम्यान, आंबोली घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी झाडेही कोसळली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
घाटातील गटारेही बांधकाम विभागाकडून साफ केली गेली नसल्याने बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर पालापाचोळा व चिखल रस्त्यावर आला होता.
दरम्यान, घाटातील दरड लवकरात लवकर हटविण्यात यावी तसेच गटारांची सफाई करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. गेल्या दोन दिवसांत आंबोलीत १३ इंच पाऊस कोसळल्याचे येथील पर्जन्यमान करणारे भाऊ गोगटे यांनी सांगितले.