सिंधुदुर्ग : रो-रो सेवा देशपातळीवर विस्तारित करण्याच्या हालचाली कोकण रेल्वेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:47 AM2018-10-02T10:47:05+5:302018-10-02T10:49:58+5:30

कोकण रेल्वेच्या  उत्पन्नात भर टाकणारी  माल वाहतुकीची रो-रो सेवा  देश पातळीवर विस्तारित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  कोकण रेल्वेच्या क्षेत्राबाहेर प्रथमच गुजरातपर्यंत ही रो- रो सेवा धावली आहे.

Sindhudurg: The Konkan Railway initiative for the widening of Ro-Ro services at the national level | सिंधुदुर्ग : रो-रो सेवा देशपातळीवर विस्तारित करण्याच्या हालचाली कोकण रेल्वेचा उपक्रम

सिंधुदुर्ग : रो-रो सेवा देशपातळीवर विस्तारित करण्याच्या हालचाली कोकण रेल्वेचा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे; उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नमुंबईतील पश्चिम रेल्वेच्यावतीने सुरतकल ते करंबेळी (गुजरात) अशी रो-रो सेवेची चाचणीवातावरणातील प्रदूषण रोखले जावे, इंधनाची बचत व्हावी आणि माल वाहतुकीचा प्रवास जलद आणि सुखकर

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या  उत्पन्नात भर टाकणारी  माल वाहतुकीची रो-रो सेवा  देश पातळीवर विस्तारित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  कोकण रेल्वेच्या क्षेत्राबाहेर प्रथमच गुजरातपर्यंत ही रो- रो सेवा धावली आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वेच्यावतीने सुरतकल ते करंबेळी (गुजरात) अशी रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे ही सेवा देश पातळीवर विस्तारित झाल्यास कोकण रेल्वेला फायदेशीर ठरणार आहे.    

वातावरणातील प्रदूषण रोखले जावे, इंधनाची बचत व्हावी आणि माल वाहतुकीचा प्रवास जलद आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने सन २००१ पासून रो-रो सेवा सुरू केली आहे. यात रेल्वेच्या मालवाहतूक करणाºया वॅगनमधूनच मालवाहतूक ट्रक आणि कंटेनर्सची ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेली अठरा वर्षे कोकण रेल्वे मार्गावरील कोलाड (रायगड) ते सुरतकल (कर्नाटक) या स्थानकांपर्यंत ही सेवा सुरू आहे. त्याचा फायदा अनेक व्यावसायिकांना होत आहे.       

कोकण रेल्वेची रो-रो सेवा इतर मार्गांवर चालविण्याबाबतची शक्यता तपासण्यासाठी पश्चिम रेल्वेच्यावतीने अलीकडेच सुरतकल ते करंबेळी (गुजरात) या दरम्यान २५ ट्रकची वाहतूक करण्यात आली. या ट्रकमध्ये प्रामुख्याने प्लास्टिक ग्रेन्युल्स, सुपारी, रोस्टेड काजू आदी सामग्रीचा समावेश होता. हे सर्व ट्रक करंबेळी येथील रेल्वेच्या ‘गुड्स’ शेडमध्ये उतरविण्यात आले.    

दरम्यान, गतवर्षी पेण ते बोईसर (वसईमार्गे) अशी रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुरतकल ते करंबेळी स्थानकापर्यंत रो-रो सेवेची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे पुढील काळात देशपातळीवर रो-रो सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.    

माल वाहतुकीची रो-रो सेवा पश्चिम रेल्वे मार्गावरदेखील सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कोकण रेल्वेने पाठविला होता. त्यानंतर सुरतकल ते करंबेळी दरम्यान रो-रो चाचणी घेण्यात आली आहे. ही एक प्रकारे अनोखी आणि पर्यावरणपूरक सेवा आहे. भविष्यात माल वाहतूक क्षेत्रात रो-रो सेवेची प्रमुख भूमिका असणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

पेण ते बोईसर रो-रो ची शक्यता!
नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर रोड, भिवंडी, वसई या भागांतील महामार्गावरील अवजड मालाच्या वाहतुकीमुळे सतत कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी उरण येथील जेएनपीटी येथून भिवंडी, बोईसर या भागांमध्ये होणाºया मालवाहतुकीसाठी पेण ते बोईसर (वसईमार्गे) अशी रो-रो सेवा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने गतवर्षी पेण ते बोईसर अशी रो-रो सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे या सर्व मार्गांवर रो-रो सेवा कार्यान्वित झाल्यास व्यावसायिकांबरोबरच रेल्वेलाही त्याचा फायदा होणार आहे असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg: The Konkan Railway initiative for the widening of Ro-Ro services at the national level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.